शिवणकाम व फॅशन डिझाईनिंगची मोफत प्रशिक्षणाचे आयोजन
करमाळा समाचार
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्था करमाळा व ज्ञानज्योती महिला गृप यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांना रोजगार मिळावा यासाठी पंधरा दिवसाचे शिवणकाम व फॅशन डिझाईनिंगची मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन 23 डिसेंबर रोजी सौ. शितल करे व यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे यांच्या हस्ते यश कल्याणी सेवा भवन येथे पार पडले. तरी पुढील पंधरा दिवस मोफत प्रशिक्षणाचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन प्रशिक्षणाचे प्रशिक्षक निशिगंधा शेंडे यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहीतीसाठी 7843003793 या क्रमांकावर संपर्क करावा.

याप्रसंगी सौ राऊत, श्री राऊत सर, मोहोळकर मॅडम, नाळे मॅडम, पेटकर मॅडम, योगिता पाटील, मंदा पेठकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रशिक्षण अभियान संस्थेचे अध्यक्ष निशिगंधा शेंडे मॅडम व अनिल शेंडे सर आदी उपस्थित होते.