करमाळासोलापूर जिल्हा

आजच्या तपासणी करमाळा शहर शुन्य तर ग्रामीण मध्ये 7 ने वाढ

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात आज एकूण 133 टेस्ट घेण्यात आल्या, त्यामध्ये ग्रामीण भागात 102 टेस्टमध्ये सात बाधित तर शहरात 31 टेस्टमध्ये एकही बाधित मिळून आला नाही. तर पहिल्यांदाच शहरात एकही रुग्ण आढळून न आल्याचं दिसून आल्याने कोरोना तून सुटका झाल्यासारखे वागू नये. कोरोना लांब ठेवण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करावे कामाशिवाय बाहेर पडू नये. मास्क वापरावे अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत.

आज एकूण 17 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने हा आकडा 1880 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर 149 वर उपचार सुरू आहेत. वेळोवेळी घरी सोडण्याचे प्रमाण वाढल्याने बऱ्यापैकी रुग्ण आता तंदुरुस्त व घरी आहेत. ज्या रुग्णांना कसलेही लक्षणं नाहीत अशा रुग्णांची घरी राहण्याची सोय केली जात असल्याने त्यांच्यावरही दडपण येत नाही व प्रशासनावरील ताण कमी होत आहे. तर आता दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर उपलब्ध असून करमाळा येथे ऑक्सिजन पुरवठा निर्मिती करण्याचे कामही सुरू आहे. आजपर्यंत तब्बल 2057 रुग्ण मिळून आले आहेत. त्यापैकी 1880 बरे होऊन घरी गेल्याने करमाळ्यातील रुग्ण बरे होण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

ग्रामीण 7 तर करमाळा शहर 0
साडे – 1
चिखलठाण- 3
शेटफळ-1
वाशिंबे- 1
वडगाव दक्षिण- 1

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE