कॉग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या भेटीला ; महाविकास आघाडीत असताना डावलल्याने खंत
करमाळा-
अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचे सोलापुर जिल्हाध्यक्ष डाॕ.धवलसिंह मोहीते पाटील यांच्या समवेत करमाळा तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी मुंबई येथे टिळक भवनमध्ये अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी त्यांच्याबरोबर नविन शासकीय समित्यांच्या निवडी संदर्भात सविस्तर चर्चा झाली.

महाराष्ट्रात काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार असतानाही शासकीय समिती वाटपाबाबत सोलापुर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुक्याबरोबरच आणखी कांही तालुक्याच्या बाबतीत दुजाभाव झाला असल्याची खंत डाॕ.धवलदादा मोहीते पाटील व प्रतापराव जगताप यांनी श्री नानाभाऊ पटोले यांच्या जवळ व्यक्त केली.यावेळी मा.नानाभाऊ पटोले यांनी आपण यात काळजीने लक्ष घालुन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच यात संधी दिली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

जो कांही पाठपुरावा यासाठी करावा लागेल तो मी निश्चितपणे करेल व पालकमंत्र्याशी व संपर्क मंत्र्याशी बोलुन सध्या पक्षासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच या समितीमध्ये काम करण्याची संधी प्राप्त करुन देईल असे आश्वासित केले. येणाऱ्या काळातील जि.प. पं.स. व नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यातील ज्यास्तीत ज्यास्त जागेवर काँग्रेस पक्षाने यश संपादीत करण्यासाठी जोरदारपणे कामाला लागा.पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवुन त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी कामाला लागा असा संदेश दिला. कांहीही अडचणी असल्यास त्या मला सांगा त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटीबध्द असेल असे शेवटी म्हणाले.
यावेळी काँग्रेस भवन मध्ये देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदेसाहेबांची भेट झाली.त्यांनीही काँग्रेस पक्षवाढीसाठी मोलाचे संदेश दिले.