दहिगाव योजना राबवली पण एक थेंबही पाणी आले नाही ; योजनेतील गावांची बोंब
करमाळा समाचार
दहिगाव उपसासिचन योजना 27 जानेवारी ला चालू केली आणि बंद 19 मे रोजी झाली घोटी, मलवडी, वरकुटे हि गाव योजनेच्या कार्यक्षेत्रत असून योजना जवळ 112 दिवस चालून देखील पाणी पहिला टप्पा व दुसऱ्या टप्प्यात एकदा पण आले नाही.

शेतकऱ्याच्या पिकाच नुकसान झाल त्याला कोण जबाबदार दर वेळी आंदोलन लेखी निवेदन देऊन पण काही दखल घेतली जात नाही. ही तर शेतकऱ्यांची चेष्टा चालू आहे म्हणून शेतकरी बोबाबोब करत आहेत. हे जाणीवपूर्वक कृत्य होत आहे. ह्याचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांने योग्य ती कारवाई करुन समस्त शेतकरी बाधवाना योग्य न्याय द्यावा टेल टू हेड च्या नियमाचे पालन करावे अशी मागणी घोटीचे नेते सचिन राऊत यांनी केली आहे.

मध्यंतरी अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पाणी सोडण्याचे आदेश दिले. पण काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी तिथे कॅनल फोडुन पाणी वळवले. त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली तरीही आजतागायत त्यांच्यावरही कसलीही कारवाई केली नाही. नेमके टेल ला हक्काचे पाणी असताना पाणी का मिळाले नाही हा प्रश्न सतावत असताना कॅनल मध्ये उतरुन काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात बोंबाबोंब केली.