जोरदार वाऱ्यामुळे तरकारी पिकाचे नुकसान ; शेतकऱ्याला आर्थीक भुरदंड
केतूर (अभय माने) –
रोजच पडणारा रिमझिम पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील पोमलवाडी (ता.करमाळा ) शिवारात तरकारी पिकाला मोठा फटका बसला आहे. येथील विकास मगर यांच्या शेतामध्ये अर्धा-एक दोडक्याच्या बागेतील लावलेला मंडप वाऱ्याच्या जोरदार वेगामुळे जमीनदोस्त झाला आहे.

उजनी लाभक्षेत्रात उसाचे पीकच प्राधान्याने केले जात असले तरी काही शेतकरी भाजीपाल्याचे ( तरकारी ) पीकही घेतात भाजीपाला पिकामुळे हातात ताजा पैसा येतो. सध्या भाजीपाला पिकालाही बाजारात योग्य दर मिळत नाही त्यातच वाऱ्यामुळे झालेले नुकसान यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे भाजीपाला उत्पादक विकास मगर यांनी “करमाळा समाचार “शी बोलताना सांगितले.

पोमलवाडी (ता.करमाळा): जोरदार वाऱ्यामुळे मंडप कोसळून जमीनदोस्त झालेले काढणीयोग्य दोडक्याचे पिक
(छायाचित्र- अक्षय माने, केतूस्)