करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आमदार मामांमुळे आम्ही तुमच्याच सोबत : खासदार निंबाळकराना येवलेंची ग्वाही !

करमाळा (प्रतिनिधी) –

मी आणि माझा परिवार हा आमदार संजयमामांचा समर्थक आहे आणि आजमितीला मामा तुमच्या सोबत असल्याने आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत,त्यामुळे तुमचा विजय निश्चित असल्याची ग्वाही ज्येष्ठ पत्रकार, मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी दिली.

माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आपल्या करमाळा दौऱ्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, मकाई सह.सा.का.चे संस्थापक-माजी संचालक विवेक येवले यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विवेक येवले,ऍड.अपूर्व येवले यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार केला.यावेळी झालेल्या चर्चेत येवले यांनी खा.निंबाळकर यांच्याशी बोलताना करमाळा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप हे तुमच्या सोबत असल्याने आम्ही सगळे तुमच्याच सोबत असून तुमच्या कार्यतत्परतेमुळे तुमचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली.

यावेळी सौ. सुप्रिया येवले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, जिल्हा भाजयुमो
अध्यक्ष शंभूराजे जगताप,माजी नगराध्यक्षा सौ.पुष्पाताई फंड,भाजपचे तालुकाध्यक्ष रामा ढाणे,सचिन वैकर,डॉ.जयंत कापडी आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE