मुलीला व्यवस्थीत संभाळत नसल्याच्या कारणातुन जावयाचा खुन !
करमाळा समाचार
मुलीला व्यवस्थित नांदवत नसल्याच्या कारणातुन मारहाण करून कशाचा तरी साह्याने गळफास देऊन जीवे ठार मारल्याची तक्रार केल्यानंतर चौघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा 13 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता वीट परिसरात घडला आहे.

मजऱ्या उर्फ मंजीत शिवाजी काळे वय 26 रा. सरपडोह तालुका करमाळा असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी शिवाजी कुडत्या काळे वय 65 यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जयब्या हुणाजी पवार, दहिवजीत जयब्या पवार यांच्यासह चौघांवर सर्व रा. वीट यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

शिवाजी काळे यांच्या मुलाशी वीट येथील जयवब्या पवार यांच्या मुली चे लग्न लावून दिले होते. त्यानंतर मुलीला व्यवस्थित सांभाळत नसल्याच्या कारणातून पवार कुटुंबीय समाधानी नव्हते अशी तक्रार फिर्यादीत करण्यात आली आहे. या कारणातून मयत मंजीत याला वीट येथे मारहाण करून गळफास देऊन ठार मारल्याची तक्रार फिर्यादीत केली आहे. त्यावरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास करमाळा पोलीस करीत आहे.