E-Paperकरमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

कोरोना नंतर बदलला जीवनाचा प्रवास ; शुभांगीचे चार जिल्ह्यांशी नाते व प्राथमिक ते यूपीएससी प्रवास

करमाळा समाचार

जगभरात कोरोना आणि थैमान घातले व प्रत्येकाचे आयुष्य बदलून गेले. यादरम्यान कित्येकाने आपले व्यवसाय ही बदलले तर बऱ्याच लोकांची दिशा या कोरोनामुळे बदलून गेली, अशातच करमाळ्याची कन्या लग्न होऊन अहमदनगर येथे आपला दवाखाना चालवत असताना कोरोना आला व दवाखाना बंद करावा लागला. दवाखाना बंद करून पुन्हा तिने अभ्यासाला सुरुवात केली व नवी दिशा तिला मिळून गेली. तिसऱ्या प्रयत्नात तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची कठीण परीक्षा उत्तीर्ण होत करमाळ्यातील पहिली महिला अधिकारी बनण्याचा मान मिळवला आहे. शुभांगी केकान (shubhangi kekan – pote) मुळगाव वंजारवाडी तर सासर तालुक्यातीलच शेलगाव (वांगी) हे आहे.

शुभांगी ही निवृत्त शिक्षक सुदर्शन केकान यांची मुलगी आहे. केकान हे सुरुवातीला शिराळ जिल्हा बीड या भागात शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने शुभांगीचे शिक्षण मराठी माध्यमातून शिराळ येथे झाले. लहान पासूनपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या शुभांगीचे पुढचे शिक्षण कर्जत येथे महात्मा गांधी विद्यालय येथे झाले. त्यावेळी तिने दहावीत ९३ टक्के तर बारावी ८६ टक्के मिळवत चांगली कामगिरी बजावली होती. घरात सर्वात मोठी व आज्ञाधारक अशा शुभांगीनी आपले बीडीएस चे वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण संगमनेर येथे २०१६ मध्ये पूर्ण केले.

शिक्षण सुरू असतानाच तिचे २०१५ मध्ये शेलगाव वांगी येथील ओंकार शशिकांत पोटे यांच्यासोबत लग्न झाले ते स्टेट बॅंकेत व्यवस्थापक म्हणुन काम पाहतात. ओंकार पोटे यांच्या सोबत शुभांगी याही अहमदनगर भागात स्थायिक झाल्या. सर्वकाही योग्य रीतीने चालू होते. यादरम्यान त्यांना एक मुलगाही झाला. त्याची देखभाल व आपला दवाखाना बघत सगळं निवांत सुरू होतं. पण अचानक कोरोना आला आणि सगळंच जागेवर थांबलं.

या काळात त्यांनी दवाखाना बंद असल्याचा एक वेगळा उपयोग करून घेतला. पूर्वी संतगतीने सुरू असलेला अभ्यास वेगात सुरू केला व लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी जोरदार केली. यावेळी कोणतेही मोठे मार्गदर्शन न घेता अनुभवाच्या जोरावर व घरीच अभ्यास करून शुभांगी यांनी पहिली परीक्षा दिली. यावेळी केवळ सहा मार्गाने त्यांचा क्रमांक हुकला. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला परंतु घरच्या अडचणींमुळे तिला सुरुवातीची परीक्षा ही पास होता आली नाही. तरीही ती डगमगली नाही तिने प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर तिसऱ्या प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली व देशात पाचशे तिसावा क्रमांक मिळवत करमाळ्याचे नावलौकिक केलं आहे.

चार जिल्ह्यांशी नाते …

शुभांगी केकाने ही वंजारवाडी करमाळा (karmala) तालुका  येथील असल्याने तिचा सोलापूर(solapur) हा पहिला जिल्हा असला तरी तिचे प्राथमिक शिक्षण हे बीड(beed) जिल्हा येथे झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण अहमदनगर (ahamadnagar) जिल्ह्यात पूर्ण केले. सासरवाडी जरी शेलगाव करमाळा तालुका असली तरी पती ओंकार पोटे हे बारामती (baramati) येथे स्थायिक असल्यामुळे पुणे (puNe) जिल्हा संपर्क आला. त्यामुळे शुभांगी ही केवळ सोलापूरचे प्रतिनिधीत्व करीत नसुन चार जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे.

अभ्यास सुरुच ठेवणार …

आभ्यासाची आवड होती आणि यूपीएससी परिक्षा देण्यासाठी आभ्यासही सुरु केला होता. पण दवाखाना व कुटुंब बघत पाहिजे तसा अभ्यास होत नव्हता. कोरोनात मात्र वेळ भेटला व पुर्ण वेळ आभ्यास करुन यश मिळवता आले. यामध्ये पतीसह सासरच्या मंडळींनी ठेवलेला विश्वास सार्थकी झाला. आता माझ्या रॅंक प्रमाणे मला कोणता विभाग मिळेल हे आत्ताच सांगणे शक्य नसले तरी आपली इच्छा आय ए एस करण्याची आहे. जी जागा आपल्याला मिळाली नाहीतर आपण नौकरी स्विकारुन पुन्हा आय ए एस साठी प्रयत्न करणार आहे.

शुभांगी केकान – पोटे,
यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी, करमाळा

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE