करमाळ्यात दिवसाढवळ्या घरफोडी ; तिघांचा शोध सुरु
करमाळा समाचार
करमाळा येथे बस आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या संगीता राजकुमार निंबाळकर (वय ५५) यांच्या राहत्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अनोळखी ठिकाणी घरफोडी करून घरातील तब्बल दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. यामध्ये दोन तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, पन्नास हजार रुपये रोख असे नेण्यात आले आहे. सदरचा प्रकार गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सटवाई परिसरात घडला.

संगीता निंबाळकर या करमाळा बसा घरात वाहक म्हणून काम करतात. त्या दि २ रोजी दुपारी करमाळा आगारात कामानिमित्त गेल्या होत्या. त्यानंतर दुपारी दीड वाजता काम उरकून त्या चार वाजेपर्यंत घराकडे आल्या. त्यावेळी त्यांना घराच्या बाजूला दोन इसम मोटरसायकलवर बसलेले दिसले. तर एक व्यक्ती घरासमोरून पळत येऊन त्या दोन इसमांकडे धावत गेला व गाडीवर जाऊन बसला. त्यांचा पाटलाग केला तोपर्यंत ते गाडीवर बसून निघून गेले होते. यावेळी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते.

तर कपाटापैकी एका कपाटाचे कुलूप तोडून आत मधील साहित्य बाहेर टाकले होते व दुसऱ्या कपाटात देखील साहित्य बाहेर पडले होते. यावेळी पाहिले असता कपाटातील सोने व रोख रक्कम असा दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक प्रविण साने हे करीत आहेत.