करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिष्टमंडळाने जरांगेकडे वेळ मागीतली ; जरांगे सकारात्मक घोषणा बाकी

करमाळा समाचार

जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाची चर्चा पूर्ण झाली आहे. यावेळी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सरकारने वेळ मागितला आहे. तर तो वेळ देण्यासाठी जरांगे पाटील मान्य झाले आहेत. यावेळी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ देण्याची शक्यता असून लवकरच जणांचे पाटील हे उपोषण सोडण्याची घोषणा करणार आहेत. पण शिष्टमंडळ 2 जानेवारी पर्यत वेळ मागत आहेत. जरांगेही तयार असल्याचे दिसत आहे. अद्याप अधिकृत घोषणा नाही. साखळी उपोषण सुरुच राहणार आहे.

यावेळी दगा फटका झाला तर पूर्ण महाराष्ट्राचे आर्थिक कोंडी करण्याची घोषणा यावेळी जरांगे पाटील यांनी केली. संपूर्ण मुंबईकडे जाणारा भाजीपाला व इतर साहित्य बंद केले जाणार आहे. तर सर्व ठिकाणी आर्थिक नाड्या बंद केल्या जातील असा इशारा अत्ताच जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सध्या तरी मनोज जरांगे पाटील सरकारला वेळ देण्याची तयारी दाखवत आहे. यावेळी दिलेला वेळ हा शेवटचा असेल असेही जरांगे यांनी सांगितले आहे. सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाची झालेली चर्चा सकारात्मक असल्याचेही जणांनी स्पष्ट केले. वेळ घ्या पण आरक्षण द्या अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

  1. सर्वावर दाखल असलेले गुन्हे माघारी घेण्याची मागणी
  2. मी दिवाळीला पण घरी जाणार नाही – जरांगे
  3. प्रत्येक तालुक्यात साखळी उपोषण सुरु राहणार
  4. २ जानेवारी पर्यत मुदत
  5. उद्या सगळे अमरण उपोषण माघार घेणार
  6. पुढचे आंदोलन मुंबई कडे
  7. तारीख लवकरच जाहीर करणार
  8. गावोगावी फिरुन सर्वांच्या भेटी घेणार
  9. उपोषण सोडले
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE