पोफळज रेल्वे रुळावर महिलेचे मृत शरीर ; तपासानंतर ओळख पटली
करमाळा समाचार
जेऊर ते पोफळज मार्गावर दुपारी चारच्या सुमारास एक अनोळखी महिलेचे मृत शरीर मिळून आले होते. संबंधित महिला ही रेल्वेच्या धडकेत मृत झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर महिलेचा करमाळा पोलिसांनी तपास घेतला असता. सदरची महिलाही जवळा येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिच्या नातेवाईकांना संपर्क करून संबंधित मृत शरीर हे त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रुक्मिणी संजय बिचितकर रा. ५५ रा जवळा ता. जामखेड जि. अहमदनगर असे त्या महिलेचे नाव असून करमाळा पोलिसांनी पोपळज येथून मृत शरीर उपजिल्हा रुग्णालय येथे आणले होते. तिच्या वर्णनावरून परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी केली असता महिला जवळचे असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर तिचे शवविच्छेदन करून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी चारच्या सुमारास जेऊर ते पोफळज मार्गावर रेल्वे दगड क्रमांक ३३६ चा ८ जवळ पोफळज शिवार ता. करमाळा या ठिकाणी ते शरीर मिळून आले होते. सदरचा तपास हवालदार चेतन पाटील व पोलिस अंमलदार विलास अलदर यांनी केला.