सोलापूर जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी मोफत दैनिक ऑनलाईन टेस्ट सीरिज ;राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कु.पूजा झोळे यांचे आयोजन
करमाळा समाचार – संजय साखरे
राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कु.पूजा झोळे यांच्या मार्फत सोलापूर जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी मोफत दैनिक ऑनलाईन टेस्ट सीरिज दि.२ मार्च २०२१ पासून सुरु करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन टेस्ट सीरिज साठी 7219281444 ह्या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन पूजा यांनी केले आहे.


पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता सक्षम तयारीच्या दृष्टीने सदर टेस्ट सिरीज घेण्यात येणार असून आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी वाढवण्यात येईल. दररोज सकाळी 11 वाजता पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असे विविध अभ्यास घटकांचे दिवसाला 1 अशी 50 प्रश्नांची टेस्ट ऑनलाईन स्वरूपात तयार करण्यात येणाऱ्या विविध व्हॉट्सॲप ग्रूपवर प्रसारित करण्यात येईल. दैनिक टेस्ट सिरीज ही रोज रात्री 12 पर्यंत असेल तसेच टेस्ट सिरीज च्या पाठविलेली लिंक द्वारे objective स्वरूपात उत्तरे नमूद करण्याची मुभा असेल. सदर लिंकवर क्लिक केल्यावर टेस्ट सुरू होईल आणि त्याकरिता 1 तासाचा अवधी असेल. सर्व प्रश्नांची उत्तरे नमूद केल्यानंतर लगेचच ऑनलाईन निकाल त्या त्या उमेदवारांना पाहता येईल. तसेच दिल्या गेलेल्या चुकिच्या उत्तरांची बरोबर उत्तरे देखील दर्शविण्यात येतील.
ही टेस्ट सिरीज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस – करमाळ्याच्या कु.पूजा झुळे यांच्या वतीने मोफत असून त्याकरिता राष्ट्रबांधव अकॅडमी पुणे व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे हे त्यांना सहाय्य करणार असून ऑनलाईन स्वरूप असेल. टेस्ट सिरीजमध्ये विषयाचा आवाका, मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न, जास्त प्रश्न विचारले जाणारे घटक अशा घटकांचा सखोल अभ्यास करण्याची पद्धत, वाचन साहित्य, मार्गदर्शकांच्या टिपणे (नोट्स) याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल. उमेदवारांच्या शंकांचे निरसन फोनद्वारे करण्यात येईल. तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा घ्यावा असे आवाहन पूजा झोळे व मिलिंद गोरे यांचे तर्फे करण्यात येत आहे.