शुल्लक कारणातुन झालेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यु ; खुनाचा गुन्हा दाखल
करमाळा समाचार
बिटरगाव (वां) येथे डोंगरे यांच्या दारात कोबा केलेला होता यावरून लहान मुलांना जाऊ नका असे म्हटल्यामुळे भांडणाला सुरुवात झाली याचा राग मनात धरून झालेल्या मारहाणीत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी या ठिकाणी घडले आहे याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना बुधवार दि नऊ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बिटरगाव वांगी येथे घडली आहे या

प्रभावती हरिदास डोंगरे, वय ६५ वर्षे रा. बिटरगाव वांगी, ता. करमाळा असे मयत महिलेचे नाव आहे. तर दिनेश दत्तात्रय पांढरे, यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सर्व रा. बिटरगाव वांगी, ता. करमाळा. शिवाजी डोंगरे (वय ४३), रा. बिटरगाव वांगी, ता. करमाळा यांनी तक्रार दिली आहे.

बिटरगाव येथील घरासमोर डोंगरे यांच्या दारात कोबा केला आहे. यावेळी लहान मुले त्यावरुन जात असल्याने डोंगरे यांनी त्या लहान मुलांना जाण्यावरुन थांबवले. दारातील कोब्यावरुन न जाणेबाबत लहान मुलांना बोलल्याचे राग मनात धरुन संशयीतांनी डोंगरे यांच्या दारात येवून “तु लय माजलेला आहे. तुझा काटाच काढतो” असे म्हणून शिवाजी यांना दिनेश पांढरे यांच्यासह इतर दोघांनी लाथाबुक्क्याने मारहण केली. त्यावेळी यातील फिर्यादीची आई प्रभावती या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना राणी पांढरे व आशा पांढरे यांनी मारहाण करुन तीला खाली पाडुन छातीवर जोरजोरात लाथा मारले या मारहाणीत प्रभावती या मरण पावल्या अशी तक्रार शिवाजी डोंगरे यांनी दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक प्रशांत मदने हे करीत आहेत.