पाच हजारापासुन चाळीस हजार कोटी पर्यत मजल गाठणाऱ्या बिग बुलचे निधन
समाचार टीम
आपल्या महाविद्यालयीन काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केलेले शेअर मार्केटचे वॉरेन बफेट तथा बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी ६:४५ वाजता निधन झाले आहे ते ६२ वर्षाचे होते त्यांना ब्रिज कॅण्डी रुग्णालयात मोठा अवस्थेत आणण्यात आले होते. शेअर मार्केटमध्ये मोठ्या गुंतवणूकदारापैकी जुनी वाला आहे एक होते

36 वर्षांपूर्वी त्यांनी केवळ पाच हजार रुपयात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. ते सध्या चार चाळीस हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहे. महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट मधून सी ए ची पदवी घेतली आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले राकेश झुनझुनवाला होते. ते स्टॉक मार्केट ट्रेडर आणि चार्टर्ड अकाउंटंट होते. ते हंगामा मीडिया आणि ॲपटेक चे अध्यक्ष तसेच वाईसरॉयल हॉटेल्स, कॉन्कॉर्ड बायोटेक, प्रोव्होग इंडिया आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस चे संचालक होते.
राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वारेन बफेट म्हटले जात होते. त्यांना शेअर बाजारात बिगबुल ही म्हणून ओळखले जाते. आकासा एअर मध्ये राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची मोठी गुंतवणूक आहे. दोघांचे एकूण भागीदारी 45 टक्के एवढे आहे. गेल्या महिन्यात पाच जुलै रोजी त्यांचा जन्मदिवस होता.