करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नागराज मंजुळेंनी करमाळ्यातील घालवलेल्या चांगल्या वाईट दिवसांच्या गप्पा ; करमाळा भुषण कार्यक्रमात झाले व्यक्त

समाचार टीम

ग्राम सुधार समिती व यश कल्याणी परिवार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे करमाळा येथे आले होते. त्यांनी लहानपण घालवलेल्या गल्लीचे आठवणी पुन्हा एकदा उजाळा दिला. लहानपणी कशा पद्धतीने मित्रांसोबत बागडायचे, खेळायचे, छोट्या-मोठ्या गोष्टी कसा आनंद लुटायचे या सर्व गोष्टींचा उलगडा करत असताना त्यांनी एक आपली काळी बाजू ही सांगण्यासाठी विसरले नाही. सदरच्या कार्यक्रमात आज त्यांनी मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या संपूर्ण उपस्थितांचे त्यांनी आपल्या भाषणांनी मनही जिंकली.

ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दास यांना करमाळा येथे करमाळा भूषण हा पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जन्मालाही आलो नव्हतो. तेव्हापासून श्री दास यांचे कार्य असून ते तेव्हापासून लिहितात व आजही ते त्यांच्या विद्यार्थ्यांचा जे आज मोठे प्राध्यापक व मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत अशा लोकांचा विचार करतात अशा या गुरूंना माझ्या हस्ते पुरस्कार देण्याचा मान मला मिळाला. हा पुरस्कार त्यांच्यासाठी नसून माझ्यासाठीच असल्याचे यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी बोलून दाखवली.

यावेळी बोलत असताना त्यांनी करमाळा शहरातील त्यांच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. करमाळ्यातील एक नंबर शाळेत आपले शिक्षण पूर्ण झाले. त्या परिसरात आपण लहानपणी जसे शिक्षण घडायला पाहिजे होते. तसेच जरी घडले नसले तरी प्रत्येक वळणावर आपल्याला नवीन नवीन शिक्षक मिळत होते व ते आपल्याला घडवत होते असे मंजुळे सांगत असतानाच मला मात्र वेगळेच शिक्षक मिळाल्याचेही त्यांनी सांगायचे विसरले नाही. लहानपणी मिळालेल्या शिक्षकांमुळे थोडीशी दिशा चुकली असली तरी चुकत चुकत आपण पुरत सावरत गेलो व त्यातून घडत गेलो असेही यावेळी मंजुळे यांनी सांगितले.

लहानपणी आपल्याला शिक्षकांनी विचारले कोणता ऋतू आवडतो. तर आपण उन्हाळा असा सांगायचं सगळे आश्चर्याने माझ्याकडे पाहायचे. उन्हाळा आवडण्या मागचं कारण ही तसंच होतं उन्हाळ्यात केलेली मौजमजा मित्रांसोबत घालविले दिवस आणि त्यावेळेसचा उन्हाळा त्यावेळेसचे रस्ते त्या रस्त्यावर अडकलेले पैशाचे नाणे आणि त्यातून लोकांना ते नाणे काढण्याची हौस आणि त्यांच्या हातानं न लागणारा त नाने ते पाहून आम्ही मोठ्याने पोट दुखेपर्यंत हसायचं असले लहानपणीचे खेळ तसेच गज पाणी खेळत रायगाव, पांडे ,मांगी पर्यंत गेलेला प्रवास या सर्वांचा आज उलगडा श्री मंजुळे यांनी करमाळा येथे केला.

मंजुळे यांनी लहानपणी शाळेच्या आवारात शाळा शिकण्यापेक्षा आपल्याला वेगळेच गुरु मिळत असल्याचेही बोलून दाखवले. त्याकाळी आपण सिनेमा पाहण्यासाठी शाळेच्या परिसरातील गज विकून सिनेमा पाहायला जायचो. तर फोडायला आणलेल्या शेंगा त्याही परस्पर विकून आपण कसं दिवस घालवायचो तेही यावेळी नागराज मंजुळे यांनी बोलून दाखवले हे सर्व बोलत असताना त्यांनी हेही सांगितले की गुरु हा आईप्रमाणे असतो आपल्या चुकांवर पांघरून ही घालतो व सक्तीने आपल्याला त्या सुधारणा करण्यासाठी ही सांगतो. तर काहीजण यशस्वी झाल्यानंतर बळच मी त्यांचा गुरु होतो असेही सांगणारे गुरु आपल्याला मिळत असतात. हेही मंजुळे यांनी सांगणे विसरले नाही.

सदरच्या कार्यक्रमात प्रस्तावना ग्राम सुधार समितीचे ॲड. बाबुराव हिरडे, यशकल्याणीए परिवारचे गणेश करे पाटील, भीष्माचार्य चांदणे आदींनी मार्गदर्शन केले. तर श्री राजेंद्र दास यांना मिळालेल्या पुरस्कारानंतर त्यांनीही आभार व्यक्त केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE