दिवंगत आमदार नामदेवराव जगताप यांची अवहेलना ; जगताप गटात नाराजी
करमाळा समाचार
नुकताच बोरगाव, करंजे, मिरगव्हाण, कोळगाव, निमगाव, गौंडरे या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी एका ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर दिवंगत आमदार नामदेवराव जगताप यांचे नाव चुकीच्या पद्धतीने लिहले आहे. या नावावरून राजकारण पेटलेले दिसून येत आहे. यापुर्वी चिखलठाण येथील फलकावरही असाच उल्लेख आढळुन आला होता.

संबंधित ठिकाणी भूमिपूजना वेळी उद्घाटन करताना लिहिण्यात आलेल्या फलकावरील नावांमुळे जगताप गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी झाली आहे. सदरच्या फलकावर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नावाची उल्लेख करण्यात आला आहे.

पण या फलकावर संजय मामा यांचे संपूर्ण नाव हे आदराने लिहिण्यात आले आहे. मात्र जयवंतराव जगताप यांच्या नावामध्ये संपूर्ण नाव लिहिताना अक्षम्य चूक केल्याचे दिसून आले आहे. जयवंतराव नामदेवराव जगताप असे नाव लिहिण्याऐवजी जयवंतराव नामदेव जगताप असे लिहिले आहे. यामुळे कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून येत आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर नाराजी व्यक्त केली आहे.
मुळातच दिवंगत माजी आमदार नामदेवरावजी जगताप यांचे नाव महाराष्ट्रात कुठेही आदराने घेतले जाते. सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दबदबा असणारे हे नेतृत्व अजरामर होऊन गेले. विरोधकही त्यांचे नाव आदरानेच घेतात. जगताप गटाची अस्मिता असणाऱ्या साहेबांच्या नावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केल्याने सोशल मेडिया मध्ये नाराजी आहे. या नाराजी नंतर सदरची चूक दुरुस्ती केली जाणार का असा सवाल विचारला जात आहे.

कार्यकर्त्यांची सोशल मिडियात पोस्ट …
सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार देशभक्त नामदेवराव महादेवराव जगताप हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध व परिचित आहे .कोणा ऐऱ्या – गैर्यांच्या एकेरी लिहिण्याने त्यांचे महात्म्य कमी होणार नाही .यशवंतराव चव्हाण , शंकरराव मोहिते पाटील , नामदेवराव जगताप या नावांमध्येच एक रुबाब व दबदबा आहे .ज्यांनी – ज्यांनी जगताप यांचेशी बेईमानी व गद्दारी केली आहे त्यांचा विनाश झालेला आहे हा पूर्व इतिहास आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे . “आमचे नेते जयवंतराव उर्फ राजाभाऊ जगताप यांना प्रेमाने राजा म्हणा अथवा रागाने राजा म्हणा तो राजाच आहे आणि राजाच राहणार “
“