E-Paperकरमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दलित महासंघाचा भाजपाला पाठिंबा ; चिवटेंच्या मार्गदर्शनात बैठक

करमाळा –

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून देशाची मान उंचवायची आहे, त्यासाठी आपण संपूर्ण ताकदीनिशी आजपासूनच तयारी करावी असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केले आहे.2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक गायकवाड चौक येथील भाजपा कार्यालयात श्री चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना व यासंदर्भात यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. करमाळा तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आपापल्या गावातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना प्रत्येक बुथवर जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर अवघडे, तालुकाध्यक्ष दीपक आरणे, शहराध्यक्ष वैजनाथ जाधव आदींनी खासदार निंबाळकरांना दलित महासंघाच्या जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.

यावेळी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत सभारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, अभिनंदन करण्यात आले. यावेळी या बैठकीसाठी करमाळा भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीतील सर्व पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE