मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हायला विलंब ; कांबळेंचे प्रशासनाला पुराव्यांचे चार पानी पत्र
करमाळा समाचार

मयत सूर्यकांत मंडलिक यांच्या मृत्यु प्रकरणी करमाळा नगरपालिकेच्या मूखाधिकारी वीणा पवार यांच्यावर सदोष मनूष्यवधाचा गून्हा दाखल होण्यास दिरंगाई होत आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून मंडलिक यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आर पी आय चे राज्य उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत नागेश कांबळे यांनी चार पानी निवेदन प्रशासनाला दिले आहे. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे क्लासवन अधिका-यावर गून्हा दाखल होण्यापूर्वी शासनाची परवानगी लागते. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून लवकर चौकशी झाली पाहिजे असे म्हटले आहे. सोबत विविध वृत्तपत्रांतून आलेली कात्रणे, निवेदने तसेच मुख्याधिकारी यांचा बेजबाबदार पणा व असंवेदनशीलता दर्शविणारी पूलाची छायाचित्रे तसेच मंडलिक यांच्या मृतदेहाचा शोध चालू असताना नगरपालिका प्रशासन पूलाचे साइडगार्ड बसवत असतानाचे छायाचित्रे अशी सविस्तर फाईलच जोडलेली आहे. याप्रसंगी मयत मंडलिक यांचे चिरंजीव अभिजीत मंडलिक ,मातंग एकता आंदोलन चे शरद पवार , देविदास कांबळे इ उपस्थित होते.