करमाळासोलापूर जिल्हा

डॉक्टरांनी वडिलांवर चुकीचे उपचार करून घरी हाकलून दिले ; इंजेक्शनही वापरले नाहीत

करमाळा समाचार

अकलूज येथील गुजर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी गेल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वडिलांवर चुकीचे उपचार करून घरी हाकलून दिले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अकलूज येथील डॉ. विवेक गुजर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व परवाना रद्द करून बिलाचे पैसे माघारी द्यावे अशी तक्रार करमाळा तालुक्यातील भिवरवाडीचे भाऊसाहेब शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

भाऊसाहेब शेळके यांचे वडील आठ एप्रिलपासून अकलूज येथील गुजर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना उपचारासाठी चाळीस हजार रुपये किमतीचे महागडे इंजेक्शन लागणार असल्याने ते आणून दिले होते. त्याशिवाय अकरा एप्रिलला रेमडीसिवीर इंजेक्शन ही आणून दिले. पण वडिलांना ते इंजेक्शन देण्यात आले नसल्याचे विचारपूस केल्यावर समजले. शिवाय वडिलांनीही ही कसलेही इंजेक्शन दिले गेल्याचे नसल्याचे सांगितल्यानंतर याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी इंजेक्शन दिल्याचे सांगुन मोकळी बाटली आणून दाखवली. त्यावेळी ही नसल्याचे सांगितल्यानंतर दुसरी बाटली दाखवल्याचे शेळके यांनी नमूद केले आहे. तर यासंबंधी डॉक्‍टरांकडे तक्रार केल्यानंतर तर त्यांनी ही प्रतिसाद दिला नाही. शिवाय “तुला काय करायचे ते कर” असे म्हणून हाकलून दिले.

त्यानंतर वडिलांजवळ गेल्यानंतर मागील चार दिवसांपासून मला अन्न , पाणी दिले नाही, तु दिलेले नारळ पाणीव पिण्याचे पाणी ही देत नव्हते. मला इथुन घेऊन चल असे वडील म्हणाले म्हणुन शेळके रुग्णाला घेऊन घरी आले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्याच दरम्यान शेळके यांच्यासह घरातील इतर मंडळींना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये दीड महिन्याचा कालावधी गेला म्हनुण तक्रार करता आली नाही. त्यामुळे आता तक्रार करताना योग्य उपचार न मिळाल्याने वडिलांचा मृत्यू झाला असे म्हणत संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व हॉस्पिटलचा कायमस्वरूपी परवाना रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी अकलूज, आरोग्य संचालक, आरोग्य सेवा अधिकारी पुणे अशा सर्वांकडे लेखी तक्रार केली आहे.

आमच्या दवाखान्यामध्ये भाऊसाहेब शेळके यांच्या वडीलांवर उपचार सुरू असताना योग्य त्या पद्धतीने उपचार सुरू होते. तर स्वतः रुग्ण रोहिदास शेळके हे दवाखान्यात गोंधळ घालत होते. स्वतःला बाथरूम मध्ये बंद करून घेत होते. पिता पुत्र वेगवेगळे आरोप करीत होते. त्यामुळे पुढील उपचार अपेक्षित दवाखान्यात घेऊन असा सल्ला पण दिला होता. त्यांनी केलेले आरोप सर्व चुकीचे असून दवाखान्यातील सीसीटीव्ही जास्त दिवसानंतर पाहता येत नाहीत. ज्या त्या वेळी मागणी केली असती तर सीसीटीव्ही पाहता आले असते. पण आता अनेक दिवसानंतर तक्रार केल्यामुळे ती उपलब्ध नाही. शेळके यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही नाही उलट उपचारादरम्यान घेऊन गेल्यावर त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्युला दवाखाना जबाबदार नाही.
डॉ.विवेक गुजर, अकलुज

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE