उपजिल्हाधिकारी प्रियांका आंबेकर यांची माढा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती
करमाळा समाचार
प्रांत अधिकारी ज्योती कदम यांची १७ एप्रिल रोजी बदली झाली होती. तर त्यांच्या जागी प्रशिक्षणार्थी समाधान घुटुकडे हे करमाळा येथील विभाग पाहत आहेत. तर आता भंडाऱ्याचे (गोसेखुर्द) येथील (उपजिल्हाधिकारी) प्रियांका आंबेकर यांची माढा येथे उपविभागीय अधिकारी (उपजिल्हाधिकारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण अजुनही इतर पदे प्रभारी आहेत.

तर तहसीलदार समीर माने यांची १३ एप्रिल रोजी बदली झाली आहे. त्यांच्या जागी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव हे काम पाहत आहेत. गटविकास अधिकारी मनोज राऊत हे ३ जुलै पासून सुट्टीवर आहेत. त्यांच्या जागी सहाय्यक गटविकास अधिकारी राजाराम भोंग हे काम पाहत आहेत. सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे हे २२ जून रोजी बदली होऊन गेले आहेत त्यांच्या जागी माढ्याचे निबंधक सुधाकर लेंडवे यांच्याकडे प्रभार दिला आहे. तर मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांची २७ जुन ला बदली झाली आहे त्यांच्या जागी कुर्डुवाडीचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे प्रभार दिला आहे.
