करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व विकासरत्न मा. आमदार नारायण आबा पाटील

महान आदमी जन्म से ही महान नही होते ,बल्की ओ परिश्रम करके महान बनते है|”

……आपल्या करमाळा तालुक्याचे विकासरत्न माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा आज वाढदिवस म्हणजे एका महान अशा विकास पुरुषाचा वाढदिवस आहे. कोणीही माणूस जन्मापासून महान असत नाही, तर त्याला महान होण्यासाठी जीवनात अथक परिश्रम घ्यावे लागतात… लव्हे-तालुका. करमाळा, जिल्हा.सोलापूर सारख्या एका छोट्याशा खेडेगावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला हा सर्वसामान्यांचा पोरगा त्याचे परिश्रमातून ,कष्टातून जनताजनार्दनाच्या हृदयातील आशास्थान म्हणून नावारूपाला आला आहे… सुरुवातीला वडील कर्मयोगी गोविंद (बापू) पाटील यांचे मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने पैलवानकी चे कित्ते गिरवायला सुरुवात केली.. कोल्हापूरच्या लाल मातीत पैलवानकी मध्ये नैपुण्य मिळवले …. तेव्हा हा पैलवान गडी राजकीय क्षेत्रात नावारूपास येईल असे कोणासही वाटले नसावे… परंतु कोल्हापूरातून नारायण (आबा )पाटील गावी आले आणि पुढे अनेक जवळचे जिवलग मित्र मंडळींमध्ये वावरू लागले… ……. वडील गोविंद (बापू )पाटील त्याकाळी आदिनाथ साखर कारखान्याची उभारणी करणे करिता अहोरात्र झटत होते आणि आपल्या तालुक्यात सहकारी साखर कारखाना आणायचाच आणि सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा या भूमिकेतून त्यांनी त्याकाळी स्वप्न पाहिले होते.. ते त्यांनी तडीस नेहले…. आणि हे वडिलांचे कष्ट ,धावपळ , नियोजन… स्वतः नारायण आबांनी जवळून पाहिले आहे.. वडील गोविंद बापू यांचा त्या काळी जेऊर आणि त्या भागामध्ये एक चांगलाच दरारा होता… त्यामुळेच लव्हे -जेऊर व त्या परिसरातील लोकांमधे लव्ह्याचे गोविंद (बापु)पाटील म्हणून ते प्रसिद्ध होते..वडिलांची राजकीय लोकांमधली उठबस चालायची ती चर्चा नारायण आबांनी जवळून पाहिलेली होती मग आपणही सर्वसामान्यांच्या हिताचा करीता समाजकारण आणि राजकारण केले पाहिजे म्हणुन त्यासाठी आबांनी आपले जिवलग मित्र-मंडळ जमवायला सुरुवात केली… अल्पावधीतच नारायण आबांना जेऊर येथील ग्रामस्थांनी नेतृत्व बहाल केले, आणि आबांची राजकीय एन्ट्री झाली, परंतु त्यावेळी देखील कोणाला वाटले नसेल की हे नेतृत्व जेऊर किंवा परिसरा पुरते सीमित न राहता एक लोकनेता म्हणून समोर येणार आहे.

politics

प्रत्येक माणसाला त्याची महत्त्वकांक्षा जीवनात जगायला शिकवते आणि महत्त्वकांक्षा असणारा माणूसच कोणतेही धाउस करण्याचा पराक्रम करत असतो आणि आदरणीय आबा हे देखील एक महत्त्वकांक्षी व्यक्तिमत्व आहे.. त्यामुळेच तर त्यांनी पुढे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे , पंचायत समिती करमाळा चे सभापती, वांगी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य…, तसेच तालुक्यातील अनेक विविध संस्थासह आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशा प्रकारची पदे भूषवलेली आहेत… त्या-त्या वेळी त्यांनी आपले कार्य-कौशल्य जनतेसमोर आणलेले आहे आणि नेतृत्व सिद्ध केले आहे.. त्यांची सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याची पद्धती ,त्यांचे स्वभावातील विनम्रता पाहीली तर त्यांचे तोडीचा नेता सापडणार नाही.. राज्याच्या राजकारणात त्यांनी आपला ठसा उमटविला असुन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राजकारणात नारायण (आबा )पाटील यांची कारकीर्द यशस्वीपणे मार्गक्रमण होत असताना त्यांना अनेक संघर्षांना देखील तोंड द्यावे लागले आहे..अनेक संघर्षमय प्रसंगाला नारायण आबांनी संयमाने तोंड दिले..,परंतु यशस्वी माणसाला जीवनात संघर्ष असतो आणि हा संघर्ष करत करत नारायण (आबा) पाटील यांनी स्वतःचे कर्तुत्वाने जनसामान्यांची मने जिंकली आहेत.. जी स्वप्ने त्यांनी पाहिली ती प्रत्यक्षात उतरवली आहेत.. एकदा- दोनदा नव्हे तर तीन वेळा विधानसभेला उभे राहिले परंतु चिकाटी न सोडता अनेक साथीदारांच्या संगतीने तालुक्याचे आमदार होण्याचे स्वप्न सन -2014 ला पूर्णत्वास आणले… सन 2014 साली करमाळाच्या राजकारणात कार्यकर्तृत्वान ,कार्यकुशल आणि जनसामान्यांचा खरा आवाज असलेला माणूस म्हणजे नारायण (आबा )पाटील यांची सार्थ निवड झाली आणि करमाळा तालुक्यासाठी एक नवीन पहाट उगवली ..सन 2014 ते 2019 मधील आदरणीय आमदार नारायण आबा पाटील यांच्या कामाचा आलेख पाहिला तर कोणासही विश्वास बसणार नाही, अशी चतुरस्त्र कामे आबांनी मार्गी लावली आहेत…आमदारकीच्या माध्यमातून करमाळा तालुका वासियांसाठी अनेक महत्वाची कामे त्यांनी खेचुन आणली आहेत.. संपूर्ण तालुक्यातून आणि जिल्ह्यातून आज आबांचे कामाचे कौतुक होत आहे.

आमदार कसा असावा याची चुणुक माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात दाखवून दिलीआहे. सत्ता येतात आणि जातात परंतु महान कार्य नेहमीच जिवंत राहते ….त्यामुळेच आबांच्या आमदारकीचा काळ आजही जिवंत असून, सर्वसामान्य जनतेचे ते आजही आमदार आहेत… तसेच सन 2019 मध्ये जरी आबांना अल्पशा मातांनी हार पत्करावी लागली असली तरी आबांचे कार्य तुमच्या- माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सोबत घेऊन निरंतरपणे चालूच आहे .…जिल्हा परिषद, पंचायत समिती याचे माध्यमातून आजही आबांचे काम त्यांचे शिलेदार चोखपणे बजावत आहेत.. त्यामुळे आबांचा एक वेगळा चाहता वर्ग तालुक्यात आणि जिल्ह्यात निर्माण झालेला दिसतो ..आबांचे नेतृत्व म्हणजे ते आपल्या हक्काचा माणूस असेच सर्वांना वाटते. करमाळा तालुक्याच्या प्रत्येक वाडी-वस्ती पर्यंत प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा हा माणूस आहे.. आमदारकीच्या काळात देखील आबा प्रत्येकाचेच सुख-दुःखात रममान असायचे.. तसे आजही आबा प्रत्येकाचे सुखदुःखात कायम तत्परतेने हजर असतात.. आबांनी स्वतःची आमदारकीची कारकीर्द त्यांचे कार्याने सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवलेली असून रस्ते, वीज, पाणी ,आरोग्य, शिक्षण अशा विविध प्रश्नांची सोडवणूक त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात केलेली आहे.. आबांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात करमाळा तालुक्याचे प्रलंबित ज्वलंत प्रश्‍न होते ते प्रश्न मार्गी लावलेले असून त्यामुळे करमाळा तालुक्यातील जनता आबांवर बेहद खुश आहे.. त्यामुळेच तर करमाळा तालुक्यातील जनतेने 2019 च्या निवडणुकीमध्ये आबांना प्रचंड मतदान केलेले आहे हे तुम्ही- आम्ही सर्वजण जाणून आहोत.

..आजही तालुक्यातील जनतेच्या मनात “आमदार” म्हणून माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे .नक्कीच भविष्यात पुन्हा एकदा तालुक्यातील जनता नारायण (आबा )पाटील यांना आमदार आणि नामदार.. केल्याशिवाय राहणार नाही, असे वाटते. सन 2019 ची आमदारकी देखील शिवसेना पक्षाचे तिकीट कापल्यामुळे व गाफील राहिल्यामुळे गेली आहे हे जनता ओळखून आहे… ज्या पद्धतीने पक्षाने उमेदवारी नाकारली ती चुक होती परंतु आजही ते त्या पक्षाचेच काम इमानेइतबारे करीत आहेत .. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस ,सारख्‍या पक्षातूनही आबांसाठी हाक आहे परंतु आबांचे शिवसेनेशी आणि शिवसैनिकांशी असलेले नाते आजपर्यंत जपले आहे…आणि यापुढेही जपतील..आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना देखील नारायण आबांवर झालेल्या अन्यायाबाबत लक्षात आलेले असून, लवकरच करमाळा तालुक्याच्या या दमदार पाणीदार आमदारांना महत्त्वाचे पद बहाल होणार असले -बाबत शुभ-संकेत मिळत आहेत…. खरंच नारायण आबांना आपला नेता म्हणून संबोधण्यात प्रत्येकालाच अभिमान वाटतो… आदरणीय नारायण आबांनी त्यांच्यातील संयम आणि नम्रतेने सर्वसामान्यांची मने जिंकली आहेत ..खरच नारायण आबा हे एक महापुरुष असून ते सतत एका महापुरुषाच्या प्रमाणे प्रत्येकाला सोबत ठेवून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उरी बाळगून ते काम तडीस नेण्यासाठी प्रेरणा देतात, जागृत करतात ,आणि आमचे मध्ये उर्जा निर्माण करतात.. आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमधील सुप्त गुणांना ओळखून त्याला विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध करून देतात…तालुक्यातील मी आणि माझे प्रमाणे पंचायत समितीचे विद्यमान सभापती अतुल पाटील ,माजी सभापती शेखर गाडे, माजी सभापती गहिनीनाथ ननावरे, उपसभापती दत्ताभाऊ सरडे , केम चे युवक नेते अजित (दादा) तळेकर व जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष अनिरुद्ध (अण्णा) कांबळे यांचेसह अनेकांना आपण महत्वाची पदे बहाल करून तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे .आदरणीय आबा नेहमी सांगतात की,” दुसऱ्यासाठी जगला तर जगणे खरे आहे आणि स्वतःसाठी जगला तर ते मेल्याप्रमाणे असते.” आणि खरच आदरणीय नारायण( आबा) पाटील यांचे जगणे हे स्वतःसाठी नसून सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे आणि म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना मनोमन आनंद होत आहे…अशा महान व्यक्तीस त्यांचे भविष्यकालीन वाटचालीसह त्यांना उत्तमोत्तम आरोग्य, सुख-संपत्ती,धनसंपदा, पद- प्रतिष्ठा लाभो…आणि करमाळा तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी मिळो…. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!….. ………………………ॲड. अजित स. विघ्ने माजी सरपंच . केत्तुर

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE