सोलापूर जिल्हासोलापूर शहर

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या सांज पहाट कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घेतला मनसोक्त आनंद

करमाळा –

दिवाळी निमित्त करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाऊंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा. डॉ. महेश निकत यांच्यातर्फे आयोजित स्वरदीप सांज पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि.२२ रोजी सायं.७ ते रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात श्रोत्यांना संगीताच्या मेजवानीसह विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्था यांना मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

शहरातील गणेश नगर येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारती समोरील प्रांगणात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दीप प्रज्वलना नंतर संदीप पाटील प्रस्तुत स्वरदीप सांज पाडवा या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या भावगीते, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते यांच्यासह बहारदार जुन्या-नव्या मराठी-हिंदी चित्रपटातील गीतांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या सोबतच करमाळा शहरातील डॉ. रविकिरण पवार, डॉ. लोकरे, डॉ.बिपिन परदेशी, डॉ.अमोल आणि सौ.स्वाती घाडगे, डॉ.विशाल शेटे, डॉ. विनोद गादीया, पंचायत समितीचे माजी उपसभापती पै. दत्ता सरडे आदींनीही या संगीत मैफिलीत आपली गायन कला तर प्रा.नागेश माने यांनी सुरेल बासरी वादन सादर केले.

 

या कार्यक्रमा दरम्यान करमाळा शहर व तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, वैद्यकीय, कृषी, क्रिडा, सांस्कृतिक, क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना (करमाळा), मराठा फोर्ट्स : दुर्ग भ्रमंती व दुर्ग जागर (करमाळा) आणि श्री नागनाथ लेझिम मंडळ (शेटफळ, ता .करमाळा), डॉ. श्रीराम परदेशी, डॉ. विशाल शेटे, पत्रकार नासीर कबीर, सिद्धार्थ वाघमारे आणि विशाल परदेशी, युवराज मगर (सरपंच, उंदरगाव), सौ. परवीन खान (सरपंच, आवाटी), त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब (करमाळा)चे सागर शिरसकर, वीर शिवाजी महाराज तलवार बाजी ग्रुप (करमाळा)चे प्रशिक्षक नागनाथ बोळगे, आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू आश्लेषा बागडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उमरड), नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर (मुलांची शाळा नं.१, करमाळा), साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१, करमाळा), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय (वीट, ता.करमाळा), त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे जुनियर कॉलेज (टाकळी,ता.करमाळा), लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ (फंड गल्ली, करमाळा), छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ (सावंत गल्ली, करमाळा), गणेश कॉम्प्युटर (करमाळा), दिशा कॉम्प्युटर सेंटर (करमाळा), वर्ल्ड कॉम्प्युटर सेंटर (करमाळा), इनडिवाइस रिसर्चचे अध्यक्ष सत्यशोधन पाटील आणि हरिहर ॲग्रो (वीट)चे रणजीत निंबाळकर यांचा मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, आफसर जाधव, श्रेणीक खाटेर व सौ. संगीता खाटेर, प्रताप जगताप, कवी प्रकाश लावंड, डॉ. अजिंक्य पवार आणि शहरातील सर्व डॉक्टर्स, जेष्ठ पत्रकार अशपाक सय्यद, ग्राहक पंचायतच्या माधुरी काकी परदेशी यांच्यासह शहरातील अनेक नागरिक श्रोते उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE