दिग्विजय बागल यांनी मंत्रालयात घेतली मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट ; केली ही मागणी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील सिना – कोळगाव धरणग्रस्त आज दि.23 जुन रोजी मकाई साखर कारखान्याचे चेरमान दिग्विजय बागल यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन करमाळा तालुक्यातील सिना – कोळगाव धरणा अंतर्गत येणाऱ्या निमगाव हवेली, आवाटी, कोळगाव, हिवरे, मिरगव्हण, भिलेवाडी आदी गावातील हजारो एकर जमीन बुडीत झालेली असून अंदाजे 732 शेतकरी जमीनग्रस्त झालेले आहेत.

या सर्व जमीनग्रस्तांना शासनाच्या अगोदर पुनर्वसन नंतर धरण हे धोरण असताना सुद्धा अजूनही त्या शेतकर्यांना न्याय मिळाला नाही. यापूर्वीही सदर प्रकरणी वेगवेगळी आंदोलने झाली, परंतु धरणग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेतली गेली नाही.

या संदर्भात सविस्तर विषय समजावून सांगितला. या विषयाची गंभीरता लक्षात घेता मंत्री महोदयांनी मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी सोलापूर यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले व लवकरच हा विषय मार्गी लावू असे आश्वासित केले आहे.