करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

माढा लोकसभा मतदार संघात नवा ट्विस्ट ; अभयदादा अपक्ष लढण्याच्या तयारीत ?

करमाळा समाचार – विशाल घोलप

माढा लोकसभा निवडणूक नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. नुकताच मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्यांनी वाईट काळात राष्ट्रवादी वाढवण्याचे काम केले असे अभयदादा जगताप आज कुठे आहेत हा प्रश्न कार्यकर्त्याना पडला आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांचे विचार ज्यांनी तळागाळात पोहचवले त्या जगताप यांच्या समर्थकामध्ये नाराजी आहे. अखेरचा निर्णय जगताप यांच्यावर अवलंबून नाराज कार्यकर्त्यांसोबत आज जगताप यांची बैठक आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाला कडवा विरोध करीत मैदानात उतरलेले अभयसिंह दादा जगताप यांच्या समर्थकांत असुरक्षित असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे दादांनी न थांबता काम सुरूच ठेवावे अशी समर्थकांची इच्छा आहे. तर लोकसभा निवडणुकीत नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या दादांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीनंतर दादा कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या नावांची पहिल्यापासूनच चर्चा सुरू होती. त्यामध्ये महादेव जानकर, संजीवराजे नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशिवाय माजी आमदार नारायण पाटील व अभय दादा जगताप यांच्याही नावाच्या चर्चा सुरू होत्या. वास्तविक पाहता अभय दादा यांनी शरद पवार यांनाच आपले नेते माणुन काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु इतर सर्व नेते वेगवेगळ्या गटागटातून प्रवेश करून उमेदवारी मिळवू पाहत होते.

अशा परिस्थितीत अभयसिंह जगताप पक्षाच्या हिताचा निर्णय म्हणून कोणतीही तडजोड करण्यास तयारी दर्शवत होते. परंतु नुकताच झालेला मोहिते पाटलांचा प्रवेश व त्यातून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती यामुळे जगताप समर्थकांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे तातडीने बैठक आयोजित करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत. तर आजच्या बैठकीनंतर जगताप कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE