करमाळा

राजुरीत कोरोना किटचे वाटप कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोळंकी परिवाराचा निर्णय

करमाळा समाचार 

कोरोनाचावाढता प्रभाव पाहता त्यावर काही ना काही उपयोजना करणे गरजेचं आहे याचं अनुषंगाने आपल्या राजुरी गावाला कायम मदतीचा हात देणाऱ्या सोळंकी कुटुंबियांच्या माध्यमातून वयस्कर लोकांना पतंजलीच्या कोरोना किटचे वाटप केले.

तसेच वाफ घेण्याचं एक औषध देण्यात आलं. अतिशय उपयुक्त अश्या आयुर्वेदिक औषधांचं वाटप झाल्याने गावातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

politics

आज ५० किटचे वाटप करण्यात आले असून लोकांची आणखी मागणी असल्याने श्री मनोज सोळंकी व संकेत सोळंकी यांना आणखी किती उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता त्यांनी लवकरच किट पाठवून देत असल्याचे सांगितले आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंडू गुरुजी, रमनकाका सोळंकी, रावसाहेब शिंदे, आत्माराम दुरंदे,मुरली भाऊ चिंचकर, भाऊसाहेब दुरंदे, पोपट सराटे, बाळासाहेब सराटे आदी जण उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE