वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप
करमाळा समाचार
भारतीय मराठा महासंघाचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष धनंजय घोरपडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जेऊर गावामध्ये एक हजार मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप करण्यात आले.

कोरोना च्या प्रादुर्भावामुळे यंदा धनंजय घोरपडे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळुन जेऊर गावा मध्ये मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप केल्या असुन कोरोना पासुन बचावा साठी जनजाग्रुती करण्यात आली.
यावेळी भारतीय मराठा महासंघ करमाळा तालुका अध्यक्ष,आनंद मोरे, तालुका संघटक राजाभाऊ जगताप, जेऊर शहर उपाध्यक्ष नानासाहेब जाधव, जेऊर शहर अध्यक्ष अविनाश पाबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमोडे तानाजी कसबे, मुबारक फकिर ,संतोष शिंदे, संजय फरतडे,राजु गरड, आनंद पवार, हो सुर्यकांत पाटील,बाळु हेळकर रामभाऊ घोरपडे, अदि उपस्थित होते.
