करमाळ्यात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; नेत्ररोग शिबीरात ४३६ रुग्णांची तपासणी – पाटील घुमरे एकत्र
करमाळा प्रतिनिधी सुनील भोसले
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व करमाळा शिवसेना युवा सेनेच्या वतीने आज 436 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटण्यात आले. हा उपक्रम कौतुकास्पद असून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची अभिप्रेत असलेली समाज सेवा या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव व शिवसेनेचे नेते विलासराव घुमरे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, मार्केट कमिटीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, पत्रकार नासिर कबीर, अशोक नरसाळे, विशाल घोलप, सचिन जव्हेरी, अतुल बोकन, जयंत दळवी, नागेश शेंडगे, सुनिल भोसले, वाघमारे, जयंत कोष्टी आदी पत्रकार उपस्थित होते.
ठाणे येथील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉक्टर दिलीप आहिरे, डॉक्टर प्रियंका अहिरे, डॉक्टर शुभम गवळी, गोविंद कुंभार यांनी रुग्णांची तपासणी करून रुग्णांना चष्मे दिले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल डुकरे, डॉक्टर गर्जे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संपूर्ण सहकार्य केले.
यावेळी उपस्थितांचे स्वागत उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत भाऊ अवताडे, युवा सेना तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, महिला तालुकाध्यक्ष प्रियंका ताई गायकवाड, उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, अमर काळे, दादा तनपुरे आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी बोलताना विलासराव घुमरे म्हणाले की, शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांच्या संघटनेमुळे मोठा झाला आहे आणि खऱ्या अर्थाने तळागाळातील समाज सेवा करण्याचे काम शिवसैनिकच करतात. आज खऱ्या अर्थाने गोरगरीब गरजू लोकांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे दिले हा कौतुकास्पद उपक्रम असून करमाळा तालुक्यातील शिवसैनिक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली समाजसेवा करीत आहे.