कृषीसोलापूर जिल्हा

कृषी विभागामार्फत बाजरी बियाणे, तूर बियाणे आणि पौष्टिक तृणधान्य पिकांचे मिनी किट वाटप

करमाळा समाचार

आज दिनांक 06 जुलै 2023 रोजी मौजे कुंभारगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे राज्य शासनाच्या कृषी विभगामार्फत तालुका कृषी अधिकारी, करमाळा आणि मंडळ कृषी अधिकारी केत्तूर यांच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत बाजरी बियाणे, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत तूर बियाणे आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने विविध पौष्टिक तृणधान्य पिकांचे मिनी किट वाटप करण्यात आले. यावेळी श्री देवीदास चौधरी मंडळ कृषी अधिकारी, उमाकांत जाधव, नितिन ठोंबरे, हरी दळवी, महेंद्र देशमुख , चेअरमन कुंभरगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनी आणि कुंभारगाव येथील शेतकरी बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींना श्री देविदास चौधरी व नितीन ठोंबरे यांच्या हस्ते बियाण्यांचे वाटप करण्यात आले त्यानंतर श्री उमाकांत जाधव यांनी पौष्टिक तृणधान्य विषयी सविस्तर माहिती उपस्थिती बांधव आणि भगिनींना दिली. यामध्ये पौष्टिक तृणधान्य म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी राजगिरा, कोदरा, कुटकी, भगर इत्यादी पिके असतात या पिकांचे भारतामध्ये जगापैकी 70 टक्के क्षेत्र आणि उत्पादन होते यामुळे भारताच्या पुढाकाराने युनायटेड नेशन यांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य साजरे करण्याचे जाहीर केले आहे त्यानुसार संपूर्ण भारतामध्ये या पिकांबाबत लोकांमध्ये जनजागृती आणि क्षेत्र वाढवण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागीय यामध्ये सक्रिय सहभाग आहे.

प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यालय महाविद्यालय यांच्यामार्फत प्रभात फेरी आयोजित करणे पौष्टिक तृणधान्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणे. कृषी विभाग विविध कार्यक्रमांतर्गत बियाणे वाटप, पौष्टिक तृणधान्ण्याचे आहारामध्ये महत्त्व तसेच या पिकांसाठी पाण्याचे अत्यल्प प्रमाण लागते तसेच हलके आणि मध्यम जमिनीमध्ये पण या पिकांचे उत्पादन घेता येते उत्पादन खर्चही या पिकांसाठी खूप कमी लागतो आणि आहारामध्ये या पिकांना विशेष महत्त्व आहे आहारातील हे महत्व श्री जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले. यामुळे या पिकांना भविष्यात खूप महत्त्व येणार आहे त्यामुळे या पिकांचे क्षेत्र वाढवण्यासाठी उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींना श्री उमाकांत जाधव यांनी आवाहन केले.

खरीप हंगामातील कडधान्य तृणधान्य व गळीत धान्य इत्यादी पिकांविषयी तांत्रिक मार्गदर्शन श्री उमाकांत जाधव कृषी पर्यवेक्षक यांनी सविस्तरपणे सांगितले यामध्ये तुर पिकासाठी योग्य अंतरावर पेरणी करणे 45 व 75 दिवसानंतर शेंडा खुडणे तसेच कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले गळीत धान्य पिकांमध्ये सूर्यफूल आणि सोयाबीन यांची माहिती दिली.
श्री देवीदास चौधरी मंडळ कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकरी बांधवांना दिली यामध्ये महाडीबीटी अंतर्गत योजना बाबत मार्गदर्शन केले प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना इ केवायसी करणे आधार शेडिंग करणे याबाबत सविस्तर माहिती श्री चौधरी साहेब यांनी दिली
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हरी दळवी यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE