वांगीमध्ये वडीलांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
करमाळा समाचार
वांगी नंबर ३ येथील युवा उद्योजक डॉ. सोमनाथ खराडे व श्री. नागेश खराडे या दोन बंधूंनी त्यांचे वडील कै. बाळू दिगंबर खराडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा वांगी नंबर ३ येथील विद्यार्थी – विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप केले. तसेच वांगी नंबर ३ गावातील तीनही अंगणवाडी शाळेतील बाल चमूसाठी खाऊ वाटपही केले.

पुणे येथे उद्योजक म्हणून काम करत असताना डॉ. सोमनाथ खराडे हे सामाजिक बांधिलकी जपत आपल्या गावासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून काम करीत असतात. या कार्यक्रमासाठी आदिनाथ चे माजी संचालक पांडुरंग जाधव, मकाई चे संचालक युवराज रोकडे, वांगी चे सरपंच मयूर रोकडे, मकाईचे स्वीकृत संचालक गणेश तळेकर, उपसरपंच संतोष कांबळे, सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. विजय रोकडे, ज्येष्ठ नेते अर्जुन तकिक, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दादा रोकडे, मारुती रोकडे, सदस्य बापूराव शिंदे, यशवंत भवर, ज्ञानेश्वर शेळके गुरुजी, शिवराज देशमुख, सुनील भुईटे वस्ताद, सचिन दरेकर, दत्तात्रय गुटाळ, राहुल सरडे, शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर, कणसे सर, राठोड सर, राऊत मॅडम, बेद्रे मॅडम, कावरे मॅडम, ढवळे मॅडम आदी सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कणसे सर यांनी केले.