E-PaperUncategorizedकरमाळा

दोभाडा हॉस्पिटल च्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

प्रतिनिधी – संजय साखरे


केतुर नंबर 2, तालुका करमाळा येथील दोभाडा हॉस्पिटलच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 15 ऑक्‍टोबर ते 17 ऑक्‍टोबर या दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. याचा केतुर पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आव्हान या शिबिराचे संयोजक व दोभाडा हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉक्टर जिनेन्द्र दोभाडा व डॉक्टर सौ. सारिका दोभाडा यांनी केले आहे.

या शिबिरामध्ये दिनांक १५ ऑक्टोबर रोजी करमाळा येथील प्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर अमोल घाडगे मोफत तपासणी करणार असून याच दिवशी करमाळा येथील दंत रोग तज्ञ डॉ. सौ. स्वाती घाडगे मोफत दंत रोग तपासणी करणार आहेत. करमाळा येथील त्वचारोग तज्ञ डॉक्टर रोहित साळुंके मोफत त्वचारोग तपासणी करणार आहेत.

दिनांक 16 ऑक्टोबर रोजी बारामती येथील मधुमेह तज्ञ डॉक्टर सुनील धाके तर करमाळा येथील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर महेश भोसले हे मोफत तपासणी करणार आहेत. रविवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत टेंभुर्णी येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. आनंद खडके हे मोफत नेत्ररोग तपासणी करणार असून त्याच दिवशी करमाळा येथील प्रसिद्ध सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉक्टर प्रशांत करंजकर हे बाल रुग्णांची तपासणी करणार आहेत.

या शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यासाठी 9421031595 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर दोभाडा हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE