करमाळ्यातील सर्व शासकीय कार्यालयात आत्याधुनिक सॅनिटायझर मशीनचे वाटप
प्रतिनिधी-संजय साखरे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि करमाळा तालुक्याचे विकासरत्न आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार यांच्या संकल्पनेतून आज करमाळा येथील तहसील कार्यालय करमाळा, मुद्रांक कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, करमाळा तालुका वकील बार असोसिएशन, करमाळा नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, उपजिल्हा रुग्णालय करमाळा कृषी कार्यालय करमाळा या ठिकाणी अत्याधुनिक सॅनिटायझर मशीनचे वाटप करण्यात आले.

सदर मशीनचे वाटप यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील . सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरक्षा विभाग रोहीत चौधरी, माजी सभापती चंद्रहास निमगीरे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जाधव, आदिनाथचे माजी चेअरमन तात्यासाहेब मस्कर, रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव, कृ.उ.बा.समिती चे माजी उपसभापती दत्तात्रय अडसुळ, भोसेचे माजी सरपंच भोजराज सुरवसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरूणकाका जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव झांझुणे, गुळसडी चे माजी सरपंच मानसिंग खंडागळे, युवा नेते शहाजी झिंजाडे, राष्ट्रवादी महीला काँग्रेस चे तालुका अध्यक्ष नलिनी जाधव, पदवीधर रा का चे अध्यक्ष रवींद्र वळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महीला नेत्या अॅड.सविता शिंदे, रा.काॅ युवती ता.अध्यक्ष शितलताई क्षीरसागर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष तौसिफ सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश काळे आदी जणांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना गणेश करे पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार यांच्या संकल्पनेतून करमाळा येथील सर्व शासकीय कार्यालयात अत्याधुनिक सॅनिटायझर मशीनचे वाटप करण्यात आले. असून कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या मशीन चा उपयोग होणार आहे. या सर्व कार्यालयात दररोज तालुक्यातील नागरिक कामासाठी येत असतात. अशा प्रकारे प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराबाहेर अशा सॅनिटायझर मशीन लावल्यास कोरोना आजाराचा नायनाट होईल असे ते यावेळी म्हणाले .
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी कंरजे ग्रा.प सदस्य गणेश सरडे,रा काॅ युवक कार्याध्यक्ष मयुर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश मोरे,योगेश अंधारे,केतन कांबळे,रा काॅ युवक उपाध्यक्ष तुषार शिंदे,सुरज ढेरे,लक्ष्मण पाटील,वाघाची वाडी चे सरपंच देवीदास वाघ,पांगरे चे उपसरपंच संजय गुटाळ,भारत जगदाळे,समाधान भोगे, रा काॅ महीला उपाध्यक्ष नंदिनी लुंगारे,रा काॅ युवती उपाध्यक्ष रूपालीताई अंधारे,तालुका सरचिटणीस संस्कृती बागल,ता.उपाध्यक्ष अनिता सरक,ता.अध्यक्ष स्नेहल अवचर , ओंकार पंलगे,विशाल कुंभार,अभिजीत चव्हाण,सुरज कांबळे,अभिजीत सुर्यवंशी आदी जण उपस्थित होते.