कुंभारगाव येथे महाबीज चे उडीद बियाणे वाटप
संजय साखरे – प्रतिनिधी करमाळा
दिनांक 10 जून 2021 रोजी मौजे कुंभारगाव येथे मंडळ कृषि अधिकारी,केतूर श्री. डी. एस. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाबीज कंपनीचे AKU-१० या जातीचे उडीद बियाणे पिक प्रात्यक्षिक म्हणून वाटप करण्यात आले.. तसेच उडिद पिकाचे महत्त्व व BBF तंत्रज्ञाना चा वापर का करावा, तसेच BBF तंत्रज्ञानाचे महत्त्व व फायदे, या विषयी माहिती व मार्गदर्शन श्री हरिदास दळवी कृषी सहायक यांनी केले.

श्री उमेश आजीनाथ पानसरे यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष BBF यंत्राच्या साह्याने पेरणी करताना बियाण्याची बीज प्रक्रिया कशी करावी या विषयी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करुन श्री. एफ.के. बागवान कृषी सहायक यांनी दाखविले.

या कार्यक्रमासाठी गावातील मा. उपसभापती बाजार समिती जालिंदर पानसरे,मा. पंचायत समिती उपसभापती लालासाहेब पाटील , सरपंच महेंद्र पानसरे,, ग्राम पंचायत सदस्य ,दत्ता जाधव,अशपक इनामदार, प्रकाश गलांडे,सावता राऊत यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नानासाहेब आढाव सर यांनी केले तर आभार श्री. एस. डी. शिंदे यांनी मानले.