डॉक्टरांच्या मुलांचा मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यासोबत वाढदिवस साजरा ; व्यक्त केला अनुभव
अमोल जांभळे – करमाळा

आज दिनांक 22 जुलै रोजी करमाळ्याचे अस्थिरोग तज्ञ(हाडांचे) डॉ.दयानंद शिंदे यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून आपल्या कमलादेवी मंदिरा शेजारील श्रीदेवीचा माळ येथील लहान मुलांची मूकबधिर शाळा आहे. सहपरिवार व हॉस्पिटल कर्मचारी यांच्यासोबत त्या शाळेला भेट देऊन आमच्या लहान अर्जुन चा वाढदिवस साजरा केला व तेथील खरोखरच ज्या गोरगरीब गरजूवंत व तेही आपल्यातीलच आहेत या संकल्पनेतून त्या मुलांना फळे वाटप व अन्नदान करण्याचा कार्यक्रम घेतला.

तेथे गेल्यावर समजलं की आपल्या मदतीची व आधाराची खरी गरज कोणाला असते व कोणाला नसते तेथे गेल्यावर त्या मुलांच्या तब्येतीची त्यांच्या राहणीमानाची व त्यांच्या जीवनशैलीची विचारपूस केली. तर खरोखरच असं जाणवलं की कधी वेळ भेटला तर आवर्जून तेथे यावं कारण तेथे गेल्यावर त्या मुलांनी इतकं आपलंसं करून आमच्या संपूर्ण परिवाराचा व सर्व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने मनापासून स्वागत करण्याची जी पद्धत खरोखरच खूप आवडली व त्यांच्या सोबत मिळून मिसळून अर्जुन चा वाढदिवस साजरा केला. तेव्हा असं ठरवलं की माझ्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीचा व परिवारातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस असो किंवा आनंदाचा दिवस मी त्यांच्यासोबत जाऊन साजरा केला पाहिजे.

कारण तिथे त्यांच्या स्वागताची पद्धत खूपच छान होती तेथे उपस्थित करमाळ्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर शिंदे सर व डॉक्टर शिंदे मॅडम यांनी त्या मुलांना मार्गदर्शन केले व तेथील शिक्षकांना मुलांसंदर्भात कशाची अडचण किंवा गरज लागल्यास संपर्क साधण्याचे आव्हान देखील केले व त्या मुलांच्या आरोग्याचे काळजी घेण्याचे मोलाचे मार्गदर्शन तेथील शिक्षकांना केले. तरी शहरातील व तालुक्यातील लोकांना मी सांगू इच्छितो की आपण एकदा तरी त्या आपल्या जवळील मूकबधिर शाळेला भेट देऊन यावं. – प्रशांत शिंदे .