करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दंगली करणाऱ्या व भडकवणाऱ्या लोकांसोबत जाऊ नका – केसरकर

करमाळा समाचार

भारत आणि पाकिस्तान हे जेव्हा वेगळे झाले त्यावेळी जाती धर्मावर देशाची विभागणी झाली होती. पाकिस्तानने जरी स्वतःला मुस्लिम राष्ट्र म्हणले असेल तरी भारताने मात्र स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणून घेतले नाही. सर्वधर्मसमभाव हीच रीत इथे चालत आली आहे. त्यामुळे जे लोक भडकवतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा जे लोक आपल्याला वोटिंग मशीन म्हणून वापर करतात त्यांच्यासोबत जाऊ नका असे आवाहन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी करमाळा येथे केले.

करमाळा येथे उर्दू शाळेत नववी व दहावीचे वर्ग वाढवण्यात आल्यानंतर आयोजित सत्कार समारंभासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर व मंगेश चिवटे हे उपस्थित राहिले होते. यांच्या सत्काराच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना केसरकर बोलत होते .

यावेळी बोलताना केसरकर यांनी शाळेला सध्या शिक्षक उपलब्ध होत नाहीत. तरी नगरपालिकेने जे शिक्षक उपलब्ध केले त्याबद्दल नगरपरिषदेचे कौतुक केले. तर ज्यावेळी माझ्याकडे उर्दू शाळेचा एखादा शिक्षक अधिकचा असेल तर सर्वात आधी करमाळ्याला प्राधान्य देईल असे आश्वासनही यावेळी दिले.

ads

सदरच्या कार्यक्रमात दीपक केसरकर यांनी संपूर्ण भाषण हे हिंदीतून केल्याने मुस्लिम समाजातील सर्व उपस्थितांची मन जिंकली. तर या कार्यक्रमाला सर्व विभागातील प्रमुखांनी हजेरी लावली होती. यावेळी जुनी पेन्शन योजना असेल किंवा इतर विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्ते व कायम पाठपुरावा करणारे शिक्षक व इतर लोकही उपस्थित होते. प्रत्येकाने आपापल्या मागण्या यावेळी मांडल्या. कार्यक्रमात विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, उस्मान शेठ तांबोळी, महेश चिवटे, शौकत नालबंद, समीर शेख, असिफ शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE