करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

झोळ यांची माहीती संशयास्पद अधिकृत पुरावा द्यावा – मराठा संघटनांची मागणी

करमाळा –

प्रा. रामदास झोळ यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली असून यासंदर्भात त्यांनी अधिकृत पत्र द्यावे अशी मागणी मराठा समन्वयक सचिन काळे यांनी केले आहे. काही वेळापूर्वी रामदास झोळ यांनी आपल्याला जरांगे यांची उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती दिली होती. त्यावरून आता मराठा समाजाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जरांगे पाटील यांनी उमेदवारी जाहीर करण्याचे ठरवले होते. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात केवळ करमाळा येथे उमेदवार उभा करणार असल्याचे सुरुवातीला जाहीर केले. परंतु नंतर ती जागा रद्द करून महाराष्ट्रात कुठेच उमेदवार न उभा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रा. झोळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीला सामोरे गेले होते.

झोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यावर आता मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यांनी या पाठिंबाला विरोध दर्शवीत संबंधित अपक्ष उमेदवार झोळ यांचा यासंदर्भातील अधिकृत पुरावा देण्याची मागणी केली आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE