करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अखेर वरदायिनी मायनस मध्ये – गेल्या दहा वर्षात तिसऱ्यांदा सर्वात कमी पाणी पातळी

करमाळा समाचार -संजय साखरे


पुणे ,सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण आज अखेर संध्याकाळी सहा वाजता मायनस मध्ये गेले असून यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. यंदा भीमा नदी खोऱ्यात अतिशय कमी पाऊस पडल्यामुळे उजनी धरण फक्त 60.66%च भरले होते .असे असले तरी धरणातील पाण्याचा योग्य वापर न केल्यामुळे उजनी धरण जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच मायनस मध्ये गेले आहे. सध्या उजनी धरणातून सीना- माढा उपसा सिंचन योजनेसाठी 297, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80, बोगद्याद्वारे 290, तर कॅनल द्वारे 2400क्युसेक् एवढा पाण्याचा विसर्ग चालू आहे.

सीना माधा उपसा, दहिगाव आणि बोगदा 25 जानेवारीपर्यंत बंद होण्याची शक्यता असून कॅनलचा विसर्ग मात्र 12 फेब्रुवारी पर्यंत चालू राहणार आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. या कमी झालेल्या पाणी पातळीमुळे उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरामध्ये अवलंबून असणाऱ्या सर्व बागायती शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे धरणकाठाचा शेतकरी मात्र अस्वस्थ झाला आहे.

आज संध्याकाळी सहा वाजता प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार उजनी धरणात 63.66% एवढा पाणीसाठा असून हा सर्व पाणीसाठा मृत स्वरूपात आहे. 12 ऑक्टोबर 2023 रोजी धरणात एकूण 96.15 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्व योजनांसाठी आतापर्यंत 31.58 टीएमसी एवढ्या पाण्याचा वापर झालेला आहे. उजनी धरण सर्वात जास्त मृतसाठा असलेले धरण आहे.

गेल्या दहा वर्षाच्या पाणी पातळीचा विचार केला तर उजनी धरण 2012- 13 मध्ये 16.26%, 2015 -16 मध्ये 14.67% तर 2023 -24 मध्ये 60.66% भरले होते.अद्याप उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडण्यासाठी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याने उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्याचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी धरण व्यवस्थापनावर आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE