डॉॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे पुरस्कार जाहीर ; मंगेश चिवटेंना पुरस्कार
करमाळा समाचार
करमाळा – येथील डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे महात्मा ज्योतिराव फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा, राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्कार तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित कणसे यांनी दिली.


सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता यशकल्याणी सेवाभवन येथे होणार असून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत तर गटविकास अधिकारी देविदास सारंगकर, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी सुग्रीव नीळ, जयवंत नलावडे, संघटनेचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण, जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमित घोगरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून गेल्या १० वर्षापासून संघटनेच्या वतीने पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, शिष्यवृत्ती मार्गदर्शक अशा विविध विभागातील शिक्षक तसेच द्विशिक्षकी व बहुशिक्षकी शाळांना हे पुरस्कार दिले जातात. तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या करमाळा तालुक्यातील व्यक्तीला राजश्री शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी तालुक्यातील स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक हे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी संघटनेचे शहाजी रंदवे, चंद्रकांत वीर, नवनाथ मस्कर, संतोष शितोळे, सुधीर माने, महेश निकत, संतोष माने, पोपट पाटील, अंकुश सुरवसे, विकास माळी, अरुण चौगुले, शरद पायघन, सुनील पवार, शरद झिंजाडे, उमराव वीर, प्रवीण शिंदे, लहू चव्हाण, सोमनाथ पाटील, दादासाहेब माळी, संपत नलवडे, अशोक कणसे, दत्तात्रय जाधव, विजय बाबर, रघुनाथ फरतडे, भरत शिंदे, नाना वारे, वैशाली शेटे, सुनिता काळे, वैशाली रोकडे, वंदना जगताप, सुनिता शितोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त शिक्षक:
चंपा जगताप (राजुरी), काशिनाथ गोमे (कविटगाव), शंकर लोणकर (सांगवी-२), सचिन शिंदे (जाधववस्ती), हरिदास माने (अवताडेवस्ती), शौकत मणेरी (वडगाव दक्षिण), सतीश कात्रेला (कुंभेज), सुनिता शिंदे (जातेगाव), अंजली निमकर (श्रीदेवीचामाळ), मिराबाई जाधवर (पाडळी), रोहिणी चव्हाण (रावगाव), नवनाथ पारेकर (कै. सीतामाता महादेवरावजी जगताप, न. प. करमाळा), प्रा. डॉ. मच्छिंद्रनाथ नागरे (श्री. उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज,केम)
आदर्श शाळा:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोयेगाव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोटी
राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्कार:
मंगेश नरसिंह चिवटे
कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, मुंबई.