दारुच्या नशेत वकीलसाहेबांचा पोलिस ठाण्यात गोंधळ ; गुन्हा दाखल
करमाळा समाचार
करमाळा पोलिस ठाण्यात शुल्लक कारणावरुन दारुच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी एका वकील महाशयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची फिर्याद पोलीस नाईक शंकर विष्णु मरळे यांनी दिली आहे.

दि.04 रोजी मरळे हे सकाळी 08/00 ते 20/00 वाजेपर्यत पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य करीत होते. 4:30 वाजताचे सुमारास पोलीस ठाणे अंमलदार कक्षामध्ये वकीलसाहेब दारुच्या नशेमध्ये आले.

पोलीस ठाणे अंमलदार कक्षात येऊन सार्वजनिक ठिकाणी जोर-जोरात आरडा ओरडा करीत गोंधळ घालत असताना त्याना पोलिसांनी तुमचे काय म्हणणे आहे ते सांगा आम्ही तुमची तक्रार घेतो. असे म्हणत असतानाही गोंधळ चालुच ठेवला.
त्यावेळी वकील साहेबांची चाल वेडी-वाकडी होती, डोळे विस्फारलेले होते, तो असंबंध बडबड करीत होता. आम्ही त्यांचे जवळ जाऊन पाहिले असता त्याचे तोंडातून उग्र स्वरुपाचा दारुचा वास येत होता. सदर इसम हा दारुच्या नशेत होता. त्यावेळी त्याचे नावा बाबत खात्री केली असता त्याचे पुर्ण नाव शेखर घाडगे रा. तरटगाव ता.करमाळा असे असल्याचे खात्रीशीर समजल्याचे पोलिसांनी सांगितले.