करमाळासोलापूर जिल्हा

जिल्हाध्यक्ष पदी इंजि. अनमोल वाघमारे यांची निवड

करमाळा समाचार 

राष्ट्रीय रविदास परिषद च्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी इंजि. अनमोल वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. करमाळा येथील इंजिनिअर, उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्ते अनमोल वाघमारे यांची नुकतीच राष्ट्रीय रविदास परीषद सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसे आधिकृत पत्र राष्ट्रीय रविदास परिषदेचे राज्य सचिव श्री राजीव भरडे यांनी दिले आहे.

अनमोल हे पूर्वीपासूनच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात सध्या ते बार्शी येथे कुटुंबासह स्थायिक आहेत. ते सध्या बार्शी येथे एल. एल.बी ची डिग्री पूर्ण करत आहेत. त्यांचे सुविद्य पत्नी ऍडव्होकेट सौ प्राजक्ता वाघमारे व श्री अनमोल यांनी
शेतकरयांचे फायद्याचे अनेक प्रकारचे ऍग्री कल्चर चे प्रोजेक्ट राबवलेत यामुळे बार्शी सह करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना हि आधुनिक तंत्रज्ञानातूंन आंतरपीक घेऊन मोठा फायदा झाला आहे.

शहरातील सुशिक्षित तरुणांना एकत्र करून व्यावसायिक मार्गदर्शन करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे
समाजातील गरजू लोकांना शासनाचे विविध योजनांचा लाभ देणे, कोरोना संकटात हि त्यांनी अनेकांना मदत केली. बऱ्याच रुग्णांच्या तक्रारी निवारण केले. असे एक ना अनेक काम श्री अनमोल वाघमारे निस्वार्थीपणे करत राहतात. असे निस्वार्थी कार्य पाहूनच आज संघटनेने श्री अनमोल यांचेवरती सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

आपण संघटनेशी प्रामाणिक राहून संघटनेच्या माध्यमातून क्रांती कारी संत व फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांची विचारधारा आपल्या समाजात पेरून समाज परिवर्तनाच्या चळवळीचा धागा बनणार असे मत श्री वाघमारे यांनी आमचे प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. त्यांचे या निवडीवरून करमाळा शहरातील मित्रपरिवारातील तरुणांनी आनंद व्यक्त करत इंजि. श्री अनमोल यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE