शिवसेनेचा सेनापतीच गायब झाल्याने करमाळ्याची सैनिक सैरभैर; मनसे तालुकाध्यक्ष घरवापसी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात शिवसेनेची जबाबदारी स्वीकारत अनेकांचा प्रवेश घडवुन आणणारे विधानसभा निवडणुकांनंतर गायब असल्याने विधानसभेपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप पुन्हा एकदा मनसेच्या वाटेवर परतले आहेत. त्यामुळे ज्या सेनापतिच्या भरवशावर शिवसेनेत प्रवेश केला होता तो सेनापती गायब झाल्यानंतर सैनिक ही सैरभैर झाल्याची दिसून येत आहे.

करमाळा तालुक्यात माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेनेचे नेतृत्व करत होते. त्यांना डावलून उमेदवारी राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना देण्यात आली होती. या सर्व प्रकारात तत्कालीन शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांची महत्त्वाची भूमिका मानली जात होती. त्यांच्या सांगण्यावरूनच माजी आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट करुन रश्मी बागल यांना संधी मिळाली होती. त्यावेळी झालेल्या अचानक बदलामुळे शिवसैनिकांना तितकेसे पटले नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये विभागणी झाली त्याचाच फायदा अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना झाला व ते आमदार म्हणून निवडून आले.

दरम्यानच्या काळात सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळलेली शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी मोठ्या प्रमाणावर बदल करत तालुक्यातील कारखान्यासह इतरही जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. त्यावेळी अनेकांचा प्रवेशही त्यांनी करून घेतला होता. त्यामध्ये मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप होते.
तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी आम्ही तानाजी सावंत यांच्या सोबत जात असल्याबाबत यावेळी संजय घोलप यांनी जाहीर केले होते. पण शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शिवसेनेने मात्र तानाजी सावंत यांनाच लांब ठेवल्याने सावंत हे करमाळा तालुक्यात पासून तर लांब झाले पण कार्यकर्त्यांचाही संपर्कात राहिले नाहीत. त्याचा तोटा आता पुन्हा एकदा कार्यकर्ते सहभागी झाले असून काहींनी पक्ष सोडला तर काही पुन्हा आपल्या जुन्या पक्षांच्या वाटेवर जात आहेत. त्याचाच भाग म्हणून मनसेचे तालुकाध्यक्ष पुन्हा एकदा स्वगृही परतल्याने त्यांच्याकडे पुन्हा एकदा तालुकाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे करमाळ्याची जबाबदारी सांभाळलेला सेनापतीच गायब झाल्याने करमाळ्याची सैनिक हे सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे.
आज पुन्हा एकदा निवडीबाबत घोलप यांना पत्र देण्या आले यावेळी प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे , शहराध्यक्ष नानासाहेब मोरे उपस्थित होते.