करमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पदाधिकाऱ्यांच्या रेट्यामुळे चुरस वाढली ; भाजपाला जागा सुटण्याची शक्यता

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्याच्या राजकारणात भाजपा व शिवसेना युतीमधून शिवसेनेला करमाळ्याची जागा मिळत आली होती. त्यामुळे भाजपने अपेक्षित असे करमाळा तालुक्याकडे कधी लक्ष दिलेले दिसून आले नाही. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी स्वबळावर भाजपाचे काम सुरू ठेवले व ते वाढवले. पण विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघात ठसा उमटवेल असे काम दिसून आले नव्हते. बागल यांनी प्रवेश केल्यापासून भाजपाची ही विधानसभेवर दावेदारी सुरू झाली आहे. तेव्हापासून इच्छुकांनीही आपली भूमिका स्पष्ट करीत उमेदवारीची मागणी केली आहे.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोठा फरक असतो. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सहा तालुके तर विधानसभेच्या निवडणुकीत केवळ एक तालुका व त्यामध्ये इतर समाविष्ट गावांचा समावेश असतो. यामुळे स्थानिक उमेदवार देण्यावर भर असतो. लोकसभा निवडणुकांमध्ये सहा तालुक्यातील कोणत्याही भागातील एक उमेदवार दिल्यास हरकत नसते. पण विधानसभा मतदारसंघात गणिते वेगळी असतात स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिले जाते.

politics

सहा तालुके एकत्र असल्यामुळे लोकसभा मतदारसंघात जागा भाजपला सुटत असली तरी सहा पैकी कोणत्याही मतदारसंघातून उमेदवार निवडला जातो. आजपर्यंत करमाळा तालुक्याला याची संधी मिळालेली दिसून आली नाही. तर शिवसेना बीजेपी मित्र पक्षामधूनही भाजप व महायुतीमधूनही भाजपला ही सदरची जागा देण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विधानसभेला ही जागा शिवसेनेला दिली जाते अशी परंपरा असतानाही आता बीजेपीने ही या जागेवर दावा केला आहे.

यामध्ये प्रामुख्याने बागल यांच्याकडून दिग्विजय बागल यांची उमेदवारी जाहीर केली पण पक्ष का अपक्ष हे जाहीर केले नाही. तर गणेश चिवटे, गणेश कराड, दीपक चव्हाण व सुहास घोलप यासारख्या पदाधिकाऱ्यांनी सदरची जागा भाजपला सोडावी व निष्ठावंतांना संधी द्यावी अशा प्रकारची मागणी पक्षाकडे केली आहे. मुळातच शिंदे गटात फूट पडल्यामुळे भाजपची दावेदारी ही प्रबळ मानली जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत संजय मामा शिंदे हे महायुतीकडून लढण्यास इच्छुक नसल्यामुळे बीजेपी या जागेवर दावा करीत आहे. त्यामुळे भाजपा स्वतः मैदानात उतरणार का शिवसेनेला जागा सोडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE