महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न
करमाळा समाचार – संजय साखरे
जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांच्या हस्ते महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम आज टाकळी ता करमाळा येथे पार पडला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नागेश काका लकडे, डॉ.गोरख गुळवे, मा.उपसरपंच सुनिल गोडसे, ज्ञानेश्वर दोडमिसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सागर आण्णा गोडसे, पै.नितिन इरचे, भारत धायगुडे, भारत धायगुडे, ग्रामविकास अधिकारी बदे, कवितके मामा, मोहन चांगण मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रधानमंञी आवास योजनेतील लाभार्थी उज्वला दत्ताञय कर्चे यांच्या घरकुलाचा उद्घाटन करून ई गृह प्रवेश करण्यात आला.