करमाळासोलापूर जिल्हा

महागाई विरोधात वाहनांना धक्का मारो आंदोलन

करमाळा समाचार

पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल महागाईच्या विरोधात आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा क्षेत्रात वाहनांना धक्का मारो आंदोलन करण्यात आले त्याचाच भाग म्हणून करमाळा युनिटच्या वतीने तालुका अध्यक्ष्य दिनेश दळवी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रपतीं यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. सदरचे निवेदन करमाळा तहसीलदार यांच्यावतीने नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी तर पोलीस निरीक्षक यांच्यावतीने सहाय्यक फौजदार विक्रम सूर्यवंशी यांनी स्वीकारले.

यावेळी बोलताना दिनेश दळवी म्हणाले की, बहोत हो गयी महंगाई कि मार अबकी बार मोदी सरकार असा नारा देत २०१४ पासून भाजप सत्तेवर आले. भाजप सरकारने महागाई कमी करण्याऐवजी महागाईचा बकासुर निर्माण केला आहे. यात पेट्रोल, डिझेल, गॅस भडका उडाला आहे. यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. मागील दोन वर्षपासून कोविड आणि लॉकडाऊनमुळे देश आणि राज्यातील जनता त्रस्त आहे. परंतु केंद्र आणि राज्य सरकारने उलट पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, वीज यांचे दर वाढवून जनतेला गरिबी आणि दारिद्रयच्या खाईत ढकलण्याचे काम करत आहे

वास्तविक पाहता सन २०१४ साली कच्च्या तेलाचे दर १०५ डॉलर प्रती बॅरल असताना पेट्रोलचे दर ७१ रुपये तर डिझेल ५७ रुपये प्रती लिटर होते. मात्र आज ते दर ७१ डॉलर प्रती बॅरल असताना पेट्रोलचे दर मात्र १०३ रुपये तर डिझेल ९२ रुपये प्रती लिटरपर्यंत आकारले जात आहे. त्यामुळे सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून सरकारने लवकरात लवकर पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या भरमसाठ वाढलेल्या किमती कमी कराव्यात, पेट्रोल व डिझेल यांना जीएसटी मध्ये आणावे, खाद्यतेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, वीज बिल माफ करावे अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दळवी यांनी दिला.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाप्रभारी आर आर पाटील, शहराध्यक्ष भीमराव कांबळे, युवा आधाडी अध्यक्ष्य विनोद हरिहर, महिला आघाडीच्या दीपाली दळवी, मोनाली हरिहर यांच्यासह बहुजन क्रांति मोर्चाचे गजानन ननवरे, गौतम खरात, दिनेश माने, आकाश दामोदरे, शंभू आहेर, संतोष शिंदे, शहाबुद्दीन शेख, कय्युम शेख, जावेद मणेरी, सागर बनकर यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE