E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

खा. विखे, खा. निंबाळकर, आ. पडळकर, आ. शहाजीबापु सह करमाळा तालुक्याचे दिग्गज नेते उद्या एकाच ठिकाणी

करमाळा समाचार


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर चे उद्घाटन 30 ऑक्टोबर रविवारी सायंकाळी सहा वाजता करमाळा येथे होणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख दीपक पाटणे यांनी केले आहे.

करमाळा शहर तालुक्यातील रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर ही अत्यावश्यक सेवा होती ही सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते. मात्र आता या सुविधेमुळे करमाळ्यातच ही सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वीच श्री कमला भवानी ब्लड बँक ची करमाळा उभारणी करून रक्ताची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी खासदार सुजय विखे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, जयंतराव जगताप, रश्मी दीदी बागल सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती रोहित वायभासे यांनी दिली आहे.

ads

करमाळा येथील रुग्णांची सेवा करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अपेक्स किडनी सेंटर या अत्याधुनिक कंपनीच्या माध्यमातून ही सेवा करमाळ्यात उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत पक्षाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणातील रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना रविवारी मंगेश चिवटे यांची भेट घ्यावी असे आव्हान रोहित वायभासे यांनी केले आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE