करमाळासोलापूर जिल्हा

गळ्यातुन चोरीला जाईल म्हणुन पर्समध्ये ठेवले ; चोरांनी पर्सच पळवली

करमाळा समाचार 

रक्षाबंधन सणानिमित्त भावाला भेटून आल्यानंतर करमाळा बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीने तालुक्यातील शिंगेवाडी येथील कोमल अविनाश गायकवाड या गृहीणीची पर्स लांबल्याने त्यामधील एक तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरुन नेल्याचा प्रकार करमाळा येथील बस स्थानकावर घडला आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोमल या 21 ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील गूरवपिंपरी या ठिकाणी भाऊ आकाश गंगावणे यांच्या घरी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. 25 ऑगस्ट रोजी बस स्थानकावर गर्दी असल्याने त्यांनी आपल्या गळ्यातील गंठण हे पर्स मध्ये ठेवले. त्यानंतर त्या भावासह करमाळा येथील बस स्थानकावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांच्याजवळ पर्स होती.

थोड्या वेळानंतर कोमल यांनी आकाश यास गावाकडे जाण्यासाठी बस कधी आहे, पाहण्यासाठी पाठवले. तेवढ्या वेळात कोमल यांची नजर चुकवून बसस्थानकावर फिरत असलेल्या चोरांनी कोमल यांची पर्स पळवली. या पर्समध्ये कोमल यांचे गंठण ठेवलेले होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE