करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तालुक्यात इलेक्शन फिव्हर चढला ; सोशल मिडियात मिर्च मसाला

केत्तूर (अभय माने)

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.मध्यंतरी झालेल्या शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फाटाफुटी नंतर या निवडणुका होत असल्याने या निवडणुका रंगतदार होणार असल्याने गावागावात चर्चांना ऊत आला आहे. वरिष्ठ पातळीवर तिकीट वाटप होत असल्याने राजकीय वारे जोरात वाहू लागले आहे.

गावागावातील,पारावर,चौका चौकात,हॉटेल,पानटपरी ,वर्तमानपत्र स्टॉल या ठिकाणी राजकीय फड रंगत आहेत. सोशल मीडिया फोडणी देण्याची काम करीत आहे.

जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात निवडणूक ही अटीतटीची होणार आहे. त्यामुळे कोण कुठे गेला ? कोणावर कोण नाराज आहे ? तिकीट कोणाला मिळणार ? पक्षाचे अधिकृत तिकीट चर्चेव्यतिरिक्त नवीन व्यक्तीला मिळणार काय? अपक्ष कोण व कितीजण लढणार ? मतदार संघातून नवीन चेहरा मिळणार काय ? शेवटी मत कोणाला देणार ? कोण आपल्या भागाचा विकास करणार ?

सोशल मीडियावरील चर्चा वादाचे कारण ठरत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने या ग्रुपवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.आपले पक्षावर,गटावर,किंवा नेत्यावर प्रेम आहे हे पटवून देण्यासाठी व्हाट्सअप कार्यकर्ते इरेला पेटले असल्याचे दिसत आहे.

आचारसंहिता … आचारसंहिता ….
सर्व शासकीय कार्यालयात कोणतीही काम घेऊन गेल्यास अधिकारी कर्मचारी आचारसंहिता … आचारसंहिता … सांगत असल्याने सर्वसामान्य जनता मात्र माघारी फिरत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE