ज्येष्ठ नेते शहाजीराव देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त करमाळ्यात सत्कार

करमाळा समाचार 

वांगी तालुका करमाळा येथील ज्येष्ठ नेते व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शहाजीराव देशमुख सर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे त्यांचा करमाळा येथे सत्कार करण्यात आला,भाजपा चे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी या छोटेखानी समारंभाचे आयोजन केले होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी करमाळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी व मोहिते-पाटील यांचेवर प्रेम करणारे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना देशमुख म्हणाले की पूर्वी राजकारण समाजकारण करत असताना शब्दाला फार किंमत असायची ती आज दिसत नाही प्रामाणिकपणे आपल्या कार्यावरती निष्ठा ठेवून काम करत राहणे ही काळाची गरज आहे, त्याचे निश्चित फळ भेटते.

याप्रसंगी सरपंच डॉ अमोल घाडगे,महेंद्र पाटील,भाजपा शहर अध्यक्ष जगदीश आगरवाल, केत्तुर चे सचिन खराडे, वांगीचे सचिन देशमुख, संजय गांधी योजनेचे सदस्य नरेंद्रसिंह ठाकुर, राजुरी चे माजी सरपंच आबासाहेब टापरे, शेलगाव चे बाळासाहेब बेरे, अशोक जाधव, तात्या सरडे, संभाजी कोळेकर, दादासाहेब पाठक, विजय निकत, शिवाजी जाधव, विशाल बनकर आदींसह विविध गावचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!