पंचायत समीती सभापतीपदासाठी उद्या निवडणुक ; सत्ताधाऱ्यांचा बोलबाला घोषणा बाकी
करमाळा समाचार
सभापती गहीनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा पंचायत समितीच्या राजकारणाकडे लक्ष लागून राहिले आहे. ज्या पद्धतीने बाजार समितीची सचिव पदाची निवड रंगतदार स्थितीत जाऊन पोचली होती. त्या पद्धतीने पंचायत समिती सभापतीच्या निवडीत एवढी चुरस बघायला मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांना अपेक्षित असलेल्या व्यक्तीलाच पदभार देण्यात येण्याची शक्यता आहे.

गहिनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पाटील गटाकडून उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच मागील वेळी उपसभापती पद भोगलेले दत्तात्रय सरडे यांच्याही नावाची कुजबुज ऐकायला मिळत आहे. पण मागील वेळी सभापती पदाची माळ जवळ जवळ अतुल पाटील यांच्या गळ्यात पडणार हे निश्चित झालेले असताना अचानक ननवरे यांचे नाव समोर येऊन पाटील यांची संधी हुकली होती. ते यंदा होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे अतुल पाटील उद्याचे सभापती असणार यामध्ये दुमत नाही.
