करमाळासोलापूर जिल्हा

सरपंच पतीकडुन ग्रामसेवकास पंचायत समीतीत मारहाण

करमाळा समाचार 

सरपंच पतीने ग्रामसेवकास शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी सरपंच पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार दि २८ जुन रोजी सकाळी आकरा वाजता पंचायत समिती कार्यालय करमाळा येथे घडला आहे. राजेंद्र रूपचंद जाधव रा.करंजे ता.करमाळा असे गुन्हा दाखल झालेल्या सरपंच पतीचे नाव आहे. ग्रामसेवक अंगद बळीराम सरडे वय ४६ वर्षे रा.चिखलठाण नं २ ता.करमाळा जि.सोलापुर यांनी फिर्याद दिली आहे.

दि २८ रोजी सकाळी आकरा वाजता पंचायत समिती कार्यालय करमाळा येथील राजाराम भोंग ( गटविकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती, करमाळा) यांच्या कॅबिनमध्ये ग्रामसेवक सरडे हे शासकीय कामकाज करीत असताना सरपंच पती राजेंद्र रूपचंद जाधव यांनी सरडे यांना आरे तुरेची भाषा बोलत “तु भालेवाडी -करंजे येथील सरपंचाबद्दल काही पण वरिष्ठ कार्यालय येथे रिपोर्ट का देतो ? माझी मंडळी सरपंच आहे, मी तिचा नवरा आहे, माझी सही तुला चालत नाही का ? बायकोच्या सहीची तुला काय गरज आहे व सरपंचाला तु हजर राहणेबाबत नोटीस का देतो, पत्र व्यवहार का करतो ? शिवीगाळी करून अंगावर धावुन येवुन तोंडावर हाताने व डाव्या पायावर लाथाबुक्याने मारहाण केली आहे. यानंतर सरडे यांनी याप्रकरणात रितसर तक्रार दिल्यानंतर सरपंच पतीवर गुम्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन जगताप हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE