अर्जुननगर गृप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भोगे यांची निवड
करमाळा समाचार
अर्जुननगर म्हसेवाडी ग्रुप ग्रामपंचायत आज दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या निवडीमध्ये सरपंच पदी श्रीमती चंद्रकला धनाजी भोगे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच त्रिंबक ननवरे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी थोरात, मालन पवार, सोनाली ढवळे, अमोल पवार व अभिमन्यू धुमाळ इत्यादी ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने चंद्रकला भोगे यांची सरपंच म्हणून निवड केली.

याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून काजी साहेब व ठोंबरे साहेब तसेच ग्रामसेवक म्हणून लटके यांनी काम पाहिले. या निवडीच्या प्रसंगी प्रकाश थोरात, अनिल थोरात, राजू थोरात, दादा थोरात, मुकेश पाटोळे, फुलचंद भोगे, नटराज भोगे, सुरेश ढवळे, बापू ढवळे, गोरख भोगे, प्रवीण भोगे, नामदेव खताळ, भाऊसाहेब अडसूळ, बळी अवसरे, माजी सरपंच ननवरे, माजी सरपंच लोखंडे व सर्व अर्जुन नगर व म्हशेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
